मुंबई: ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ब्रिदवाक्य असलेल्या या लाल परीची चाके गाव-खेड्यात पोचली नि ग्रामीण भागातील लोकांची दळणवळणाची सोय झाली. एसटीने समाजातील विविध घटकांसाठी सवलतीत प्रवासाची सोय केली. अगदी लहानापासून ज्येष्ठांपर्यंत अनेकांना एसटीच्या विविध योजनांचा लाभ मिळतो. एसटी महामंडळाने यंदा अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केलं आहे. आपला 74 वा वर्धापन दिन साजरा करीत असतानाच, एसटीने ज्येष्ठ नागरिकांना मोठा धक्का दिला आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या प्रवासावर एसटीकडून मोठ्या प्रमाणात बंधनं घालण्यात आली आहेत.
एसटी महामंडळाकडून 65 वर्षांवरील ज्येष्ठांना प्रवासात 50 टक्के सवलत देण्यात येते. त्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना यापूर्वी फक्त आपले ओळखपत्र दाखवावे लागत होते. आता एसटीने सवलत धारकांसाठी ‘स्मार्टकार्ड’ योजना आणली आहे. ज्येष्ठांसाठी ‘स्मार्टकार्ड’ बंधनकारक करण्यात आलं असून, हे कार्ड बनविण्यासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. 1 जुलैपासून ‘स्मार्टकार्ड’ असणाऱ्या ज्येष्ठांनाच तिकिटात सवलत मिळणार आहे. तसेच, ‘स्मार्टकार्ड’ धारकांनाही आता काही मर्यादा घालून देण्यात आल्या आहेत. त्यानुसार, ‘स्मार्टकार्ड’च्या सवलतीत आता फक्त 4 हजार किलोमीटरच प्रवास करता येणार आहे.
जेष्ठांमध्ये नाराजी
ज्येष्ठ नागरिकांना यापूर्वी अशी कोणतीही मर्यादा नव्हती. मात्र, एसटीनेने आपल्या 74 व्या वर्धापन दिनी ज्येष्ठांना झटका दिला आहे. सवलतीत प्रवासासाठी वर्षाला 4 हजार किलोमीटरची मर्यादा घालून दिल्याने आता ज्येष्ठांचा प्रवासही मर्यादित होणार आहे. या निर्णयाबाबत ज्येष्ठांमधून मोठ्या प्रमाणात नाराजी दिसत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम