द पॉइंट नाऊ प्रतिनिधी : सोशल मीडियावर रोज नवनवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. आता एका नव्या नवरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. या नवरीचा उखाणा ऐकाल तर तुम्हालाही हसू आवरता येणार नाही.
हा व्हिडीओ कुठला आहे हे अद्याप समजल नसलं तरी नवरीचा उखाणा नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस पडत आहे. साताऱ्याचे कंदी पेढे प्रसिद्ध आहेत. त्याचाच आधार घेऊन नवरीने हा उखाणा तयार केला आहे.
लग्नानंतर गृहप्रवेशावेळी नवरी हा उखाणा घेत असल्याचे व्हिडिओ मधून दिसून येत आहे. मात्र घरात प्रवेश करण्याआधीच हा उखाणा घेत नवरीचे धाडसाचे कौतुक केले जात आहे.
वसंतराव दिसतात कंदी पेढ्यावाणी, मात्र आहेत काळ्या रेड्यावाणी असा उखाणा नवरीने घेतला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम