पं. समिती निवडणूकांचे बिगुल वाजणार आरक्षण सोडत जाहिर

0
22

देवळा: निवडणुकींच्या रणसंग्रामात राज्यातील पंचायत समितीचे आरक्षण सोडत आज जाहीर झाले आहे. यामुळे येत्या काळात उमेदवार आपले दंड थोपटण्यासाठी तयार झाल्याचे चित्र आज स्पष्ट झाले आहे. बहुप्रतीक्षित आरक्षण सोडत आज जाहीर झाल्याने इच्छुकांनी आपला मोर्चा आता प्रचाराकडे वळण्याची शक्यता आहे.

देवळा पंचायत समिती गण आरक्षण पुढील प्रमाणे-

विद्यार्थी पणव अनिल कांबळे यांनी चिट्टी काढत पुढील आरक्षण सोडत केली आहे. यावेळी तहसीलदार विजय सूर्यवंशी, नायब तहसीदार बनसोडे तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

१)लोहणेर गण- सर्वसाधारण
२)खालप- अनुसूचित जमाती राखीव
३)वाखारी- सर्वसाधारण महिला
४)खर्डे- नागरिकांचा मागास प्रवर्ग
५)मेशी- अनुसूचित जाती महिला राखीव
६)उमराणे- सर्वसाधारण महिला

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here