एटीएममधून पैसे काढताना लक्षात ठेवा या गोष्टी! नाहीतर पडू शकते महागात

0
38

The point now – आता कॅश शिवाय अनेक महत्त्वाच्या गोष्टी केल्या जाऊ शकतात . तुम्ही ऑनलाइन पेमेंट ॲप्स द्वारे  करून पेमेंट प्रक्रिया पूर्ण करू शकता. पण एटीएममधून पैसे काढण्याची गरज पूर्णपणे संपलेली नाही. एटीएममधून पैसे काढताना तुमची फसवणूक होऊ शकते. म्हणून कुठल्या गोष्टी करू नयेत आणि सावधान राहण्यासाठी पुढे सविस्तर वाचा एटीएममधून पैसे काढताना आता अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. एक छोटीशी चूक तुमचे मोठे नुकसान करू शकते. ज्याचे पालन करून तुम्ही सुरक्षित पैसे काढू शकता.

• एटीएम पिन काही महिन्यांनी बदलत राहा

एटीएम पिन बदलण्याचा अर्थ असा नाही की तो रोज बदलला पाहिजे. यामुळे तुम्हाला पिन लक्षात ठेवण्यात खूप अडचणी येतील आणि 3 वेळा चुकीचा पिन टाकल्यास कार्ड ब्लॉक होईल. तुमचा एटीएम पिन दर 2 ते 3 महिन्यांनी बदला. जेणेकरून कोणी तुमचा गैरफायदा घेऊ शकत नाही तुमचे पैसे काढू शकत नाही.

• एटीएम वापरताना ही काळजी घ्या

एटीएम वापरताना अनेक वापरकर्त्यांना समस्यांना सामोरे जावे लागते. अनेक एटीएममध्ये पैसे भरण्याची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कार्ड बाहेर येत नाही. अशा परिस्थितीत ते एटीएमजवळ उभ्या असलेल्या कोणत्याही अनोळखी व्यक्तीची मदत घेतात. अज्ञात व्यक्ती तुमची फसवणूक करू शकते. हे बहुतेक कमी शिकलेल्या लोकांसोबत घडते. जर तुम्हाला एटीएम मशीन कसे वापरायचे हे माहित नसेल तर तुमच्या ओळखीच्या आणि विश्वासू व्यक्तीला घेऊन जाऊ शकता पण कोणता अनोळखी व्यक्तीशी मदत घेऊ नका ती तुम्हाला फसवू शकते.

• एकापेक्षा जास्त एटीएम बसवल्यास विशेष खबरदारी

अनेक वेळा एकाच ठिकाणी दोन किंवा अधिक एटीएम बसवले जातात. अशा वेळी तुमच्या शेजारी उभी असलेली अज्ञात व्यक्ती फसवणूक करणारा ठरू शकतो. यामुळे तुम्हाला अधिक सावध राहण्याची गरज आहे. एटीएममध्ये पिन टाकताना तुम्ही दुसऱ्या हाताने ते लपवू शकता शक्यतो कोणी एटीएम मध्ये नसतानाच एटीएम मध्ये जाऊन पैसे काढा कारण अशा व्यक्ती तुमचा एटीएम चोरून गपचूप पिन बघून तुमचा गैरफायदा येऊ शकते. एटीएम पिन लपवल्यामुळे तुमच्या मागे किंवा शेजारी उभ्या असलेल्या व्यक्तीला तुमच्या एटीएम कार्डचा पिन कळणार नाही. एटीएम वापरताना आजूबाजूला पाहण्याची खात्री करा. जर तुम्हाला काही संशयास्पद वाटले तर दुसऱ्या एटीएममध्ये जाणे चांगले ठरेल.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here