देशातील गहू आणि पिठाच्या किमती रोखण्यासाठी सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केलेली आहे. देशात गव्हाचा दर 3000 रुपये प्रति क्विंटलच्या वर गेलेला आहे तर पीठही 40 रुपये प्रति किलो वर पोहोचलेले आहे. अशातच सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने आता 29.50 रुपये किलो दराने पीठ विकण्याची घोषणा केलेली आहे.अशाप्रकारे आता सरकारच्या निर्णयानंतर 11 रुपयांनी पीठ मिळणार स्वस्त. 6 फेब्रुवारीपासून, National Agricultural Co-operative Marketing Federation of India (NAFED) आणि नॅशनल कोऑपरेटिव्ह कंझ्युमर फेडरेशन लिमिटेड (NCCF) ह्या कंपनी स्वस्त पिठाची विक्री सुरू करणार आहेत.
राज्यपालांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ चालविण्यासाठी घेतला महत्वाचा निर्णय
CNBCTV हिंदीच्या वृत्तानुसार; हा निर्णय सामान्य लोकांना पिठाच्या पुरवठ्याच्या आढावा निदर्शनास आल्यानंतर घेतलेला आला आहे. नाफेड आणि एनएफसीसी वेगवेगळ्या आउटलेटद्वारे 29.50 रुपये प्रति किलो पीठ विकणार आहेत. हे पीठ विविध किरकोळ दुकाने, मोबाईल ,व्हॅन आदींमधून स्वस्त दरात विकले जाईल. या संस्था भारत अत्ता या नावाने किंवा अन्य नावाने विकतील.Food Corporation Of India (FCI), केंद्रीय भंडार, National Agricultural Co-operative Marketing Federation of India (NAFED) आणि नॅशनल कोऑपरेटिव्ह कंझ्युमर फेडरेशन लिमिटेड (NCCF) यांच्या DFPD सचिवांसोबत झालेल्या बैठकीत या संस्था 3 लाख मेट्रिक टन उचल करतील असा निर्णय घेण्यात आला.या गव्हापासून बनवलेले पीठ स्वस्त दरात विकणार आहे. केंद्रीय भंडारने यापूर्वीच 29.50 रुपये किलो दराने पीठ विकण्यास सुरुवात केलेली आहे. NAFED आणि NFCC सहा फेब्रुवारीपासून या दराने पीठ पुरवठा सुरू करतील.
राज्य संस्थांना स्वस्तात मिळेल पीठ
राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशातील कोणतीही महामंडळ/सहकारी संस्था/महासंघ किंवा स्वयं-सहायता गट केंद्र सरकारकडून २३.५० रुपये प्रति किलो दराने खरेदी केल्यानंतर ते ग्राहकांना रु. 29.50 प्रति किलो विकू शकतात. बैठकीमध्ये FCI द्वारे अवलंबलेल्या सामान्य प्रक्रियेनुसार ई-लिलावाद्वारे व्यापारी, पीठ गिरण्या इत्यादींना केंद्रीय भांडारमधून 25 लाख मेट्रिक टन गहू विकण्यासही मान्यता देण्यात आली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम