उन्हाळ्यातील उष्णतेपासून दिलासा ; मान्सून केरळात आज होणार दाखल

0
27

द पॉइंट नाऊ प्रतिनिधी : यंदाच्या वर्षी पावसाचे वेळेअगोदर आगमन होणार आहे. मान्सून येण्याच्या वाटेवर आहे. दरम्यान आज मान्सून केरळमध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

‘असनी’ चक्रीवादळामुळे यावर्षी नैऋत्य मोसमी वाऱ्यांना पोषक असे  वातावरण निर्माण झाले असल्याने मान्सून विनाअडथळा दाखल होणार असल्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. तसेच विदर्भामध्ये अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस बरसणार असल्याचा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवला आहे.

तसेच यावर्षी पाऊस ९९ टक्के होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. २७ मे रोजी पावसाची सुरुवात केरळमध्ये होईल तर पुढील ५ दिवसात महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

 

 

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here