Reel चा नाद डोक्यावर बेतला ! प्रार्थना बेहरेच्या डोक्यावर मोबाईल पडल्याने डोक्याला टेंगुळ

0
26

द पॉइंट नाऊ प्रतिनिधी : ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेमधील नायिका नेहा कामत म्हणजेच प्रार्थना बेहेरे हिने काही वेळ ब्रेक घेतला आहे. प्रार्थना काही काळासाठी तिच्या नवऱ्यासोबत सुट्ट्या घालवण्यासाठी लंडनला गेली आहे. प्रार्थना तिच्या लंडन ट्रीपचे व्हिडिओ, फोटो चाहत्यांसाठी तिचा सोशल मीडिया वर शेअर करत आहे. मात्र, व्हिडिओ बनवण्याच्या नादात प्रार्थनासोबत असे काही झाले की त्याची कुणी कल्पनादेखील केली नसेल.

प्रार्थना बेहेरेनं तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओच्या सुरूवातीस प्रार्थनाने तिचा मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट करत आहे. पण हा व्हिडिओ मध्यंतरी थांबतो आणि दुसऱ्या भागात प्रार्थना थंड पाण्याची बाटली घेऊन कपाळ शेकवत असल्याचे दिसून येते. तर नक्की काय झालं असा प्रश्न पडतो तर झाले असे की, व्हिडिओ बनवण्यात प्रार्थना इतकी गर्क होती की तिच्या हातामधील मोबाईल फोन तिच्याच डोक्यावर जोरात आपटला. तो फोन इतका जोरात आदळला की तिच्या कपाळाला भलमोठ्ठ टेंगुळ आलं. ‘टेंगुळ’ असं लिहत प्रार्थनाने हा व्हिडिओ शेअर केला आहे.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here