नवी दिल्ली: जून महिन्याचा पहिला दिवस सर्वसामान्यांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी घेऊन आला आहे. होय, देशातील प्रमुख गॅस कंपन्यांनी विनाअनुदानित एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत 136 रुपयांनी कपात केली आहे. ही कपात 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत करण्यात आली आहे, तर 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत या कपातीनंतर राजधानी दिल्लीत 19 किलोच्या एलपीजी सिलिंडरची किंमत 2,354 रुपयांवरून 2,219 रुपयांवर आली आहे.
दिल्लीत 14.2 किलोच्या विनाअनुदानित सिलेंडरची किंमत 1,003 रुपये आहे. मुंबईत घरगुती किचन सिलेंडरची किंमत 1002.5 रुपये आहे. कोलकातामध्ये त्याची किंमत 1,029 रुपये आहे, तर चेन्नईमध्ये 1018.5 रुपये आहे. गेल्या महिन्यात सर्वसामान्यांना मोठा झटका बसला होता. तेल कंपन्यांनी मे महिन्यात घरगुती स्वयंपाकाच्या सिलिंडरच्या दरात दोनदा वाढ केली होती. विनाअनुदानित 14.2 किलो एलपीजी सिलेंडरची किंमत 7 मे रोजी प्रथम 50 रुपयांनी आणि नंतर 19 मे रोजी 3.50 रुपयांनी वाढवण्यात आली. घरगुती एलपीजी सिलिंडर व्यतिरिक्त व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीतही वाढ झाली आहे. तेल कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 104 रुपयांची वाढ केली होती.
देशातील प्रमुख शहरांमधील किमती
आजपासून 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत 136 रुपयांनी कमी झाली आहे. दिल्लीत आता 19 किलोचा व्यावसायिक सिलिंडर 2,354 रुपयांऐवजी 2219 रुपयांना मिळणार आहे. येथे किमती 136 रुपयांनी कमी झाल्या आहेत. कोलकातामध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 133 रुपयांनी कमी झाली आहे. येथे आता किंमत 2,322 रुपयांपर्यंत खाली आली आहे. यापूर्वी याची किंमत 2455 रुपये होती. मुंबईत सिलेंडर 2307 वरून 2,171.50 रुपये प्रति सिलेंडरवर झाले आहे. येथे किमती 135.50 रुपयांनी कमी झाल्या आहेत. तर चेन्नईमध्ये 19 किलोचा व्यावसायिक गॅस सिलिंडर आता 2373 रुपयांना मिळणार आहे. यापूर्वी त्याची किंमत 2,508 रुपये होती.
14 महिन्यांत 190 रुपयांची वाढ
एप्रिल 2021 पासून आतापर्यंत एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 190 रुपयांनी वाढ झाली आहे. याआधी मार्च 2022 मध्येही एलपीजी सिलिंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. त्याआधी 6 ऑक्टोबर रोजी घरगुती गॅसच्या दरात 50 रुपयांपर्यंत वाढ झाली होती.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम