उन्हाळ्यात सुरुवात झाल्यावर मार्च ते मे महिन्याच्या दरम्यान पापड लोणचे तसेच मिरच्यांचे वाळण मोठ्या प्रमाणावर करत असतात. लाल मिरच्यां आणि मसाला बनविण्यासाठी लागणाऱ्या इतर वस्तूंना मोठी मागणी असते. भारतात उत्पादित लाल मिरचीला जगभरातून मागणी वाढत आहे. अपेक्षेपेक्षा कमी उत्पादन झाले आहे.
जानेवारी महिन्यापर्यंत कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश या भागात चक्रीवादळ, अवकाळी पाऊस झाल्याने तेथील मिरची उत्पादनाचे नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने मुंबई आणि ठाणेमध्ये मिरचीच्या दरांमध्ये यंदा ३० ते ४० टक्क्यांनी वाढ झाली. तर इंधन दरवाढीमुळे मसाल्यासाठी लागणाऱ्या जिन्नसांच्या दरातही सुमारे १० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
जेवणात तिखटपणासाठी तेजा मिरचीचा तर मसाल्याला लाल रंग येण्यासाठी बेडगी मिरची मोठ्या प्रमाणावर ग्राहक खरेदी करतात. महाराष्ट्रात घरोघरी मसाले बनवण्याकरता करिता महिला संकेश्वरी, काश्मिरी, रेशरेशमपट्टी या मिरच्यांची खरेदी करतात. राज्यातून नवी मुंबई येथे कृषी उत्पन्न बाजार समितीत मिरच्या विक्रीसाठी दाखल होत असतात. यंदा पीक वाढीच्या काळात चक्रीवादळ आणि अवकाळी पाऊस धडकल्याने मिरची पिकाचे मोठे नुकसान झाले.त्यामुळे मिरची उत्पादनात घट झली.
संकेश्वरी मिरचीचे उत्पादन कोल्हापूरमधील गडिहग्लज, तेजा मिरचीचे उत्पादन तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि बेगडी मिरचीचे उत्पादन हे कर्नाटक राज्यात घेतले जाते. यामुळे गृहिणींकरिता यंदाचा मसाला महागला आहे.महाराष्ट्रात कर्नाटक आणि आंध्रप्रदेशातून मिरचीची आवक होत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम