Mobile Security alert : आज सकाळपासून देशातील बऱ्याच जणांच्या मोबाईलवर एक सिक्युरिटी अलर्ट येत आहे. अचानकपणे मोबाइल वाजल्याने हा प्रकार नक्की काय? होता याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
गुरुवारी सकाळी दहा ते साडेदहा वाजेच्या सुमारास अनेक मोबाईल धारकांचा मोबाईल अचानकपणे मोठ्या आवाजात वाजायला सुरवात झाली. आणि लागलीच यानंतर मोबाईलच्या स्क्रिनवर एक मेसेज आला. त्यामध्ये हा मेसेज भारत सरकारच्या दूरसंचार विभागाच्या आपत्कालीन मेसेज सेवेचा भाग असल्याचे नमूद करण्यात आलेले होते. दरम्यान काही सेकंद मोठ्या आवाजात मोबाइलचा अलार्म वाजल्यानंतर तोच मेसेज व्हॉईस मेल स्वरुपात देखील ऐकू आला.
आपत्कालीन मेसेज वर आलेल्या ओके या बटनावर क्लिक केल्यावर तुम्हाला असे आपत्कालीन अलर्टस हवे आहेत का? असं देखील विचारण्यात आले. याचप्रमाणे हो आणि नाही असे दोन पर्याय देण्यात आले होते. दोन वेळा असा अलर्ट मोबाइलवर आला यात आधी हा अलर्ट इंग्रजीत आला आणि त्यानंतर मराठीत मध्ये आला होता.
यातील विशेष बाब म्हणजे सर्व अँड्रॉईड मोबाईलवर हा संदेश आला असून फक्त त ऍपल आयफोनवर असा कोणताही अलर्ट आलेला नाही.
अशाप्रकारच्या आपत्कालीन मेसेज सेवेच्या ट्रायल अलर्ट देण्यात येणार असल्याबाबत सरकारकडून कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे या अलर्टमुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. तसेच अनेक शक्यता व्यक्त करत करण्यात येत होत्या. केंद्र सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालय किंवा पीआयबीच्या ट्विटर हँडलवरही याबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही.
देशातील कोट्यावधी नागरिकांच्या मोबाईलवर अचानक आलेल्या या मेसेजबाबत चिंता करण्यासारखे काही नसल्याचे समोर येत आहे. केंद्र अथवा राज्य सरकारने याबद्दल घोषणा केली नसली, तरीही राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभाग अशा स्वरूपाची सेवा देऊ शकण्याच्या क्षमतेचा आहे. विशिष्ट भौगोलिक परिसरात अथवा देशभरात एकाच वेळी सर्व मोबाईल नंबरवर आपत्कालीन सूचना पाठविण्याची या विभागाची क्षमता आहे.
भूकंप, मुसळधार पाऊस, पूरस्थिती तसेच इतर आपत्ती काळात सूचना देण्यासाठी चाचणी सुरू असल्याचे या विभागाने यापूर्वी म्हटले होते.
भूकंप, मुसळधार पाऊस, पूरस्थिती तसेच इतर आपत्तीच्या वेळी असा अलर्ट राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात येणार आहे. त्याची चाचणी सध्या सुरू आहे. भविष्यात आपल्या भागात काही आपत्कालीन सूचना द्यायची असेल तर आपल्या मोबाईलवर याप्रकारे अलर्ट दिला जाईल.
https://thepointnow.in/anti-corruption/
दरम्यान आपल्याला असा अलर्ट आल्यास त्यावर दिलेल्या सूचना जरूर वाचाव्यात आणि त्यांचे पालन करावे, असे आवाहनही राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाने त्यांच्या पोर्टलवर यापूर्वी केले आहे.
प्रत्येक मोबाईलमध्ये आपात्कालीन अलर्ट फीचर बंधनकारक!
केंद्र सरकारचे मोबाईल बनवणाऱ्या कंपन्यांना आदेश दिले आहेत. जुन्या स्मार्टफोनमध्येही सॉफ्टवेअर अपडेट करताना आपत्कालीन अलर्ट फीचर देण्याचं अनिवार्य केलं आहे. हे इमर्जन्सी अलर्ट फीचर इतर अनेक देशांतील स्मार्टफोन कंपन्यांनी दिले आहे. यासोबतच जुन्या स्मार्टफोनमध्येही सॉफ्टवेअर अपडेट हा भारत सरकारच्या दूरसंचार भागांकडून चाचणीचा इशारा करताना आपत्कालीन अलर्ट फीचर देण्याचं अनिवार्य करण्यात आलं आहे.
का घेण्यात आला हा निर्णय ?
सध्या भारतासह जगभरात नैसर्गित आपत्तींचे प्रमाण वाढले आहे. बघता बघता पत्त्यांचा बंगला कोसळावा
तसं तुर्कीमधल्या अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या. कुणी कल्पनाही केली नसेल इतकं मोठं हे संकट आले होते. हे संकट कधी आणि कुठेही येऊ शकते यामुळे खबरदारी म्हणून हे पाऊल उचलण्यात येत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम