माजी सैनिक मारहाण प्रकरण; देवळा येथे रास्ता रोको

0
45
देवळा येथे शेतीच्या वादातून झालेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेले माजी सैनिक मांगु लोखंडे यांना न्याय मिळाला व आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन सपोनि पुरुषोत्तम शिरसाठ ,तहसीलदार विजय सूर्यवंशी यांना देतांना माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी आदी (छाया -सोमनाथ जगताप )

देवळा : येथील माजी सैनिक मांगु लोखंडे व त्यांच्या पत्नी , मुलीला बेदम मारहाण झाल्याच्या निषेधार्थ आज बुधवार (दि२५) रोजी देवळा येथे आजी माजी सैनिक संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले .

देवळा येथे शेतीच्या वादातून झालेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेले माजी सैनिक मांगु लोखंडे यांना न्याय मिळाला व आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन सपोनि पुरुषोत्तम शिरसाठ ,तहसीलदार विजय सूर्यवंशी यांना देतांना माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी आदी (छाया -सोमनाथ जगताप )

यावेळी संघटनेच्या वतीने अमानुषपणे मारहाण करणाऱ्या आरोपींना कडक शासन व्हावे ,या मागणीचे निवेदन सहायक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ व तहसीलदार विजय सूर्यवंशी यांना देण्यात आले .याप्रसंगी कळवण , देवळा व सटाणा येथील माजी सैनिक मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तब्बल दीड तास सुरू असलेल्या या रास्ता रोको आंदोलनामुळे विंचूर प्रकाशा राज्य महामार्गावरील वाहतु सेवा ठप्प झाली होती.

याबाबत अधिक माहिती अशी की , शेतीच्या रस्त्याच्या वादातून सख्या भावाने माजी सैनिक असलेला सख्खा भाऊ ,भावजय व पुतणीला शनिवारी (दि २१) रोजी बेदम मारहाण केली आहे. या घटनेचा देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ,आरोपीना ताब्यात घेतले आहे. सख्खा भाऊ संजय रतन लोखंडे त्याची पत्नी मनीषा,मुलगा सागर व प्रेम ,यांनी फिर्यादी मांगु रतन लोखंडे व त्याची पत्नी कल्पना तसेच मुलगी माधुरी यांना बेदम मारहाण केली.

या मारहाणीत माजी सैनिक मांगु लोखंडे , पत्नी ,मुलगी गंभीर जखमी झाले असून ,त्यांच्यावर नाशिक येथे लष्करी इस्पितळात उपचार सुरू आहेत. कुऱ्हाड , कोयता व लोखंडी सळई अशा तीक्ष्ण धारदार हत्यारांनी अतिशय जीवघेणा प्राणघातक हल्ला झाल्याचा घटनेचा आजी माजी सैनिक संघटनेने तीव्र निषेध व्यक्त केला असून, आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी माजी सैनिक संघटनेचे जनसंपर्क अध्यक्ष प्रविण बोरसे यांच्यासह उपाध्यक्ष पंडित आहेर, कैलास पगार, राजाराम सोनवणे ,संतोष थोरात दीपक झाल्टे ,विजय पगार ,भाऊसाहेब आहेर , दिलीप आहेर, केशव अहिरे ,संदीप देवरे, रवींद्र पगार बागलाण सैनिक सेनेचे अध्यक्ष गांगुर्डे , भामरे , कळवण मनसे आघाडीचे शशिकांत पवार , जिल्हा महिला मनसे आघाडी अध्यक्षा सौ. निर्मला पवार आदींसह बहुसंख्य माजी सैनिक उपस्थित होते . व या घटनेचा निषेध व्यक्त केला. कुठलाही अनुचित प्रकार न घडता आंदोलन शांततेत पार पडले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here