मेष- आज आपल्या राशीला धनलाभ होतांना दिसत आहे. मोठ्या भावंडांसोबत पूर्वी काही समस्या होत्या तर त्या दूर होऊन नात्यात मधुरता येईल. स्वभावातील क्रोध, उग्रपणा आपल्या चांगल्या दिवसाला व्यर्थ करेल. एकंदरीत आजचा दिवस आपल्यासाठी चांगलाच आहे. गुंतवणूक करायची असल्यास करू शकता. प्रेमीं युगलांसाठी दिवस तसा उत्तम आहे. वाहन चालवताना सावधानीपूर्वक चालवा.
शुभ अंक 5, शुभ रंग हिरवा.
वृषभ- आजचा दिवस आपल्याला उत्साहवर्धक आहे. पारिवारिक जीवनात काही समस्या होत्या तर त्या दूर होतांना दिसत आहे. नवीन काही तरी करावे अशी इच्छा मनात घोळत राहील. नोकरदारांना आज चा दिवस उत्तम आहे कार्यक्षेत्रात लाभ संभवतो, पदोन्नती होऊ शकते. कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्यासाठी दिवस उत्तम आहे. कुठलेही असे महत्वपूर्ण कार्य जे अनेक दिवसांपासून पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत होते ते आज पूर्ण होऊ शकते. कुटुंबातील सदस्यांपासून साह्य होईल. जोडीदाराकडून सहकार्य लाभेल.
शुभ अंक 1, शुभ रंग केशरी.
मिथुन- आर्थिक लाभ होतांना दिसत आहे. प्रयत्नांना यश मिळेल. काही महत्वपूर्ण कार्याची सुरुवात करायची असेल तर करू शकता. महत्वपूर्ण निर्णय ही घेऊ शकता. धनसंचय ही आज करू शकता. गुंतवणूक करण्यासाठी ही दिवस उत्तम आहे. व्यापारी वर्गासाठी दिवस अत्यंत सकारात्मक आहे. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. आज स्वतःला सिध्द करण्याचा दिवस आहे. इकडच्या गोष्टीं तिकडे करणे आज टाळावे, कुणी सांगितलेली त्याची गोपनीय गोष्ट दुसऱ्या कुणाला सांगू नका. प्रेमीं युगलांसाठी दिवस उत्तम आहे, बऱ्याच दिवसांनी पासून प्रपोज करणे टाळत असाल तर आज करू शकता.
शुभ अंक 8, शुभ रंग पांढरा.
कर्क- आज आपल्याला विनाकारण मानसिक अशांती जाणवेल. थोडे कष्ट घ्यावे लागतील. कार्यक्षेत्रात काही नवीन अडचणी उद्भवू शकतात. वरीष्ठ आज तुम्हांला समजून घेण्याचा प्रयत्न करतील. मेहनतीचे हवे तितके फळ मिळणार नाही म्हणून नाराजी राहील. आज आपला दिवस काहीसा प्रतिकूल दिसत आहे दिवसाच्या उत्तरार्धात गोष्टींमध्ये सुधार होईल. कुठलाही महत्वपूर्ण निर्णय घेणे टाळावे. गुंतवणूक करणे टाळावे. प्रेमीं युगलांसाठी दिवस ठीकठाक आहे.
शुभ अंक 3 शुभ रंग पिवळा.
सिंह- दिवसाचा पूर्वार्ध थोडा प्रतिकूल असला तरी उत्तरार्धात परिस्थितीत बदल होईल. इतरांच्या सहकार्याने कामे पूर्ण होतील. आर्थिक चिंता होती ती दिवस मावळे पर्यंत दूर होईल. धनागमन होईल. करियर संबंधात कुठला महत्वपूर्ण निर्णय घ्यायचा असेल तर आज तो घ्यावा त्याने फायदा होईल. ज्यांच्याशी मतभेद अथवा मतभेद आहे अश्या लोकांशी संवाद साधला पाहिजे. कार्यक्षेत्रात प्रगती होण्याचे योग आहेत. कार्यक्षेत्रातील नवीन संधींचा फायदा घेण्यासाठी पुढील काळ चांगला आहे. कुठल्याही कागदपत्रांवर सही करतांना पूर्ण खात्रीपूर्वक करावी.शक्यतो आजच्या दिवशी हे करणे टाळलेले बरें.
प्रेमीं युगलांसाठी दिवस ठीकठाक आहे.
शुभ अंक 2, शुभ रंग गुलाबी.
कन्या- आज कुठूनतरी आपल्याला खुशखबर येईल. कुठले महत्वाचे कार्य असेल तर नियोजन करून ते करावे लाभ आवश्य होईल. आज लोकांशी मिळून मिसळून वागा. काहीतरी मोठा फायदा आज आपल्याला होईल.नोकरीत वरिष्ठांच्या नाराजीस सामोरे जावे लागेल. व्यापारी वर्गास दिवस उत्तम आहे. आज उधार किंवा उसने पैसे देने टाळावे. वाहन सावकाश चालवावे. जोडीदाराचा सहयोग लाभेल. प्रेमीं युगलांसाठी दिवस ठीक आहे.
शुभ अंक 2, शुभ रंग काळा.
तुला- योजनाबद्ध पाऊल उचलल्यास यश हमखास भेटेल. करियरमध्ये मोठा बदल करायचा असेल तर सर्व बाजू समजून कराल तर फायदा होईल. व्यापारी वर्गासाठी दिवस उत्तम आहे. मेहनतीने फायदा मिळेल. आखलेल्या योजनांना यश येईल. कुठल्याही दुविधा मनस्थितीत असाल तर आजूबाजूच्या लोकांशी बोलून निर्णय घ्या. प्रेमीं युगलांसाठी नात्यात खटके उडण्याची शक्यता आहे.
शुभ अंक 6, शुभ रंग गुलाबी.
वृश्चिक- आज आई वडिलांची साथ लाभेल. गृहकलह उत्पन्न होऊ शकतो. आज अशी कुठली गोष्ठ बोलू नका किंवा करू नका ज्याने आपली प्रतिष्ठा कमी होईल, मलिन होईल. आजच्या दिवशी आपल्याला केवळ धैर्याने काम घ्यावे लागेल. घाईघाईत निर्णय घेणे टाळावे. संपत्ती संदर्भात निर्णय घेण्यास दिसव चांगला नाही. प्रेम संबंधात मधुरता ठेवण्याचा प्रयत्न करा.
शुभ अंक 2, शुभ रंग नारंगी.
धनु- आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे. सर्व प्रकारे हा तुमचाच दिवस आहे. वडिलांसोबत काही तात्विक वाद होते ते दूर होतील. मोठ्या भावंडांकडून सहकार्य लाभेल व लहान भावंडांकडून सन्मान. आपल्या मेहनतीचे फळ आज सर्वार्थाने मिळेल. भागीदारीत लाभ संभवतो. देवाण घेवाण करतांना काळजीपूर्वक करा. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी त्याकडे दुर्लक्ष करून आज चालणार नाही.
प्रेमीं युगलांसाठी दिवस चांगला आहे.
शुभ अंक 3, शुभ रंग पारवा.
मकर- आज आपल्याला वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल. दिवस तसा चांगला आहे. कुठलीही नवीन ऑफर स्वीकारण्यापूर्वी सर्व बाजूने पडताळून पहावी. आज आपल्याला कुठून तरी खुशखबर प्राप्त होईल. तुमच्या व्यक्तिवाचा प्रभाव आज लोकांवर पाडाल. इकडचे तिकडे करणे आज टाळावे. मनातील भावना व्यक्त करण्यापूर्वी त्या व्यक्ती ची विश्वसनीयता पडताळून बघा. प्रेमीं युगलांसाठी दिवस चांगला आहे.
शुभ अंक 2, शुभ रंग आकाशी.
कुंभ- आज आपले मन विचलित असेल. दिवसाचा पूर्वार्ध जरी अशांतता निर्माण करणारा असला तरी उत्तरार्धात चांगला असेल. आज कुठलेही बेकायदेशीर कार्य करणे टाळावे. काही चुकीचे विचार येत असेल तर ते लगेच डोक्यातून बाहेर काढा. आज कुठली मोठी जोखीम घेणे टाळा. नोकरदार वर्गास दिवस ठीकठाक आहे. गुंतवणूक करणे टाळावे, धैर्याने काम घ्या अथवा आर्थिक नुकसान होऊ शकते. जोडीराच्या मनाचा विचार करा.
प्रेमीं युगलांसाठी दिवस ठीक आहे.
शुभ अंक 5, शुभ रंग क्रीम.
मीन- आजचा दिवस आपल्यासाठी प्रतिकूल आहे म्हणून महत्वाच्या कार्यासाठी प्रवास करायचा असेल तर आज शक्यतो टाळणे उत्तम होईल. कार्यक्षेत्रात आज मन लागणार नाही. कुटुंबात काही तणाव उत्त्पन्न होऊ शकतो.गुंतवणूक करणे टाळावे. व्यापारी लोकांनां ही दिवस चांगला नाही. व्यर्थ खर्च होतांना दिसत आहे. कुठलीही जोखीम आज घेणे टाळावे. प्रेम संबंधात दिवस चांगला नाही वाद निर्माण होतील. भूतकाळातील गोष्टीं पुन्हा समोर येऊन वाद होतील.
शुभ अंक 8, शुभ रंग आकाशी.
ज्योतिषशास्त्री
शाशीसुत;
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम