जिल्ह्यात खतांचा तुटवडा थांबणार; पालकमंत्र्यांनकडून संबंधित कंपनींची कानउघाडणी

0
54

नाशिक: जिल्ह्यात खत टंचाई जाणवत असल्याची बाब निदर्शनास आल्याने नाशिक जिल्हा पालकमंत्री दादाजी भुसे यांनी कृषि विभाग व सर्व खत कंपनी प्रतिनिधी यांची नाशिक जिल्हयात अनुदानित खत पुरवठ्याबाबत आढावा बैठक घेतली. यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे यांना गंभीर बाबी निदर्शनास आल्याने त्यांनी तातडीने सर्व कंपनीना पत्र व्यवहार करत दिलेले टार्गेट नुसार खत पुरवठा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

जिल्ह्यात अनेक कंपनीने महिनानिहाय प्राप्त झालेल्या आवंटनानुसार नियमीत अनुदानित खतांचा नाशिक जिल्हयात पुरवठा केलेला नसल्याची बाब पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आल्याने मंत्री भुसे यांनी सबंधित यंत्रणेला शेतकऱ्यांना खताचा तुटवडा जाणवायला नको यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या असून येत्या आठ दिवसाच्या आत ही कोंडी सोडविण्याची सूचना केली आहे.

सद्यस्थितीत नाशिक जिल्हयात पेरणीच्या अनुषंगाने, युरीया खताच्या मागणीत मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. या बाबत कृषि विभागाने सबंधित कंपनी प्रतिनिधी यांचेकडे वारंवार पाठपुरावा करुन देखील नाशिक जिल्हयात खतांचे रेक उपलब्ध होत नसल्याचे मंत्री भुसे यांच्या निदर्शनास आले आहे, तसेच जिल्हाधिकारी यांनी देखील याबाबत कंपनीस लेखी पत्र दिल्याची बाब आढावा बैठकीत निदर्शनास आली आहे.

जिल्ह्यात जवळपास सर्वच कंपनीने मंजुर आवंटनानुसार अनुदानित खतांचा पुरवठा जिल्हात न केल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेवून या बाबत संबंधित खत कंपनीचे राज्यस्तरीय अधिकारी यांना भ्रमणध्वनी द्वारे नियमीत खत पुरवठ्याबाबत पालकमंत्री दादाजी भुसे यांनी सुचना दिल्या आहेत, त्यानुसार नाशिक जिल्ह्यात तात्काळ मंजुर आवंटनाप्रमाणे मागील पुरवठ्यातील तुटीसह शिल्लक खत पुरवठा करावा, तसेच युरीया खताचा प्राधान्याने तात्काळ पुरवठा करण्या बाबत आदेश संबंधित पुरवठादार कंपनीना दिले आहेत. तसेच कृषी आयुक्त पुणे यांना देखील समन्वय साधून खत टंचाईची समस्या आठवड्या भरात सोडविण्याचे निर्देश दिलेत.

कंपनी आणि खत पुरवठा सद्य स्थिती….

रा.खत उत्पादक कंपनी- चंबळ फर्टिलायझर अॅन्ड केमिकल लि. (विभागीय कार्यालय, पुणे. ) या कंपनीस कृषि आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांचेकडुन माहे ऑगस्ट २०२३ अखेर १५५६० मे.टन अनुदानित खत पुरवठ्याचे आवंटन मंजुर करण्यात आले आहे. कंपनीने आजपावेतो जिल्हयात १३५५ मे.टन (०९%) अनुदानित खतांचा पुरवठा केला आहे. तथापी कंपनीने जिल्हयात जवळपास १४२०५ मे.टन खतांचा कमी पुरवठा केला आहे. पैकी युरीया खताचा १११५ मे.टन कमी पुरवठा केला आहे.

रा.खत उत्पादक कंपनी- राष्ट्रीय केमिल ॲन्ड फर्टियलाझर्स लि. मुंबई या कंपनीस कृषि आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांचेकडुन माहे ऑगस्ट २०२३ अखेर ८८९१० मे.टन अनुदानित खत पुरवठ्याचे आवंटन मंजुर करण्यात आले आहे. कंपनीने आजपावेतो जिल्हयात ५३६२९ मे.टन (६०%) अनुदानित खतांचा पुरवठा केला आहे. तथापी कंपनीने जिल्हयात जवळपास ३५२८१ मे.टन खतांचा कमी पुरवठा केला आहे. पैकी युरीया खताचा १५२३२ मे.टन कमी पुरवठा केला आहे.

किरकोळ बाजारात 178 रू. किलो लसूण, अचानक एवढा भाव का वाढला?

रा.खत उत्पादक कंपनी- इंडीयन पोटॅश लिमिटेड. (विभागीय कार्यालय, पुणे.) या कंपनीस कृषि आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांचेकडुन माहे ऑगस्ट २०२३ अखेर १२७६० मे. टन अनुदानित खत पुरवठ्याचे आवंटन मंजुर करण्यात आले आहे. कंपनीने आजपावेतो जिल्हयात २४३४ मे.टन (१९%) अनुदानित खतांचा पुरवठा केला आहे. तथापी कंपनीने जिल्हयात जवळपास १०३२६ मे.टन खतांचा कमी पुरवठा केला आहे. पैकी युरीया खताचा १२०० ने.टन कमी पुरवठा केला आहे.

रा.खत उत्पादक कंपनी- कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड.
(विभागीय कार्यालय, पुणे ) या कंपनीस कृषि आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांचेकडुन माहे ऑगस्ट २०२३ अखेर २१२५० मे.टन अनुदानित खत पुरवठ्याचे आवंटन मंजुर करण्यात आले आहे. कंपनीने आजपावेतो जिल्हयात १३६६८ मे.टन (६४%) अनुदानित खतांचा पुरवठा केला आहे. तथापी कंपनीने जिल्हयात जवळपास ७५८२ मे.टन खतांचा कमी पुरवठा केला आहे. पैकी युरीया खताचा २११० मे.टन कमी पुरवठा केला आहे.

रा.खत उत्पादक कंपनी- इंडियन फार्मर्स फर्टियलाझर को. ऑप. लिमिटेड (इफको) (विभागीय कार्यालय, पुणे. ) या कंपनीस कृषि आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांचेकडुन माहे ऑगस्ट २०२३, अखेर २२७०० मे. टन अनुदानित खत पुरवठ्याचे आवंटन मंजुर करण्यात आले आहे. कंपनीने आजपावेतो जिल्हयात ६९६६ मे.टन (३१%) अनुदानित खतांचा पुरवठा केला आहे. तथापी कंपनीने जिल्हयात जवळपास १५७३४ मे.टन खतांचा कमी पुरवठा केला आहे. पैकी युरीया खताचा ११६६८ मे.टन कमी पुरवठा केला आहे.

रा. खत उत्पादक कंपनी- साऊथर्न पेट्रोकेमिकल कोऑपरेशन लिमिटेड. (विभागीय कार्यालय, पुणे) या कंपनीस कृषि आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांचेकडुन माहे ऑगस्ट २०२३ अखेर ४३०० मे.टन अनुदानित खत पुरवठ्याचे आवंटन मंजुर करण्यात आले आहे. कंपनीने आजपावेतो जिल्हयात १४८ मे.टन (०६%) अनुदानित खतांचा पुरवठा केला आहे. तथापी कंपनीन जिल्हयात जवळपास ४१५२ मे.टन खतांचा कमी पुरवठा केला आहे. पैकी युरीया खताचा ४९५२ मे.टन कमी पुरवठा केला आहे.

रा.खत उत्पादक कंपनी- नॅशनल फर्टिलाझर ॲन्ड केमिकल लिमिटेड. (विभागीय कार्यालय, पुणे) या कंपनीस कृषि आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांचेकडुन माहे ऑगस्ट २०२३ अखेर युरीया खताचे ७५०० मे.टन आवंटन मंजुर करण्यात आले आहे. कंपनीने आजपावेतो जिल्हयात युरीया खताचा पुरवठा केलेला नाही. कंपनीने महिना निहाय प्राप्त झालेल्या आवेदनानुसार नियमीत अनुदानित खतांचा नाशिक जिल्हयात पुरवठा केलेला नाही.

रा. खत उत्पादक कंपनी- कृषक भारती को. ऑप. लिमिटेड (कृभको) (विभागीय कार्यालय, पुणे) या कंपनीस कृषि आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांचेकडुन माहे ऑगस्ट २०२३ अखेर ३११०० मे.टन अनुदानित खत पुरवठ्याचे आवंटन मंजुर करण्यात आले आहे. कंपनीने आजपावेतो जिल्हयात ४७७२ मे.टन (४८%) अनुदानित खतांचा पुरवठा केला आहे. तथापी कंपनीने जिल्हयात जवळपास १६३२८ मे.टन खतांचा कमी पुरवठा केला आहे. पैकी युरीया खताचा ९६९७ मे.टन कमी पुरवठा केला आहे.

रा.खत उत्पादक कंपनी- गुजरात स्टेट फर्टिलायझर अॅन्ड केमिकल लिमिटेड (विभागीय कार्यालय पुणे) या कंपनीस कृषि आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांचेकडुन माहे ऑगस्ट २०२३ अखेर ६१०० मे.टन अनुदानित खत पुरवठ्याचे आवंटन मंजुर करण्यात आले आहे. कंपनीने आजपावेतो जिल्हयात १६६३ मे.टन (२७%) अनुदानित खतांचा पुरवठा केला आहे. तथापी कंपनीने जिल्हयात जवळपास ४४३७ मे.टन खतांचा कमी पुरवठा केला आहे. पैकी युरीया खताचा ६६५ ने.टन कमी पुरवठा केला आहे.

रा.खत उत्पादक कंपनी- पॅरादिप फॉस्फेट लिमिटेड. (विभागीय कार्यालय, पुणे) या कंपनीस कृषि आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांचेकडुन माहे ऑगस्ट २०२३ अखेर ४५९४० मे.टन अनुदानित खत पुरवठ्याचे आवंटन मंजुर करण्यात आले आहे. कंपनीने आजपावेतो जिल्हयात १७३४ मे.टन (४७%) अनुदानित खतांचा पुरवठा केला आहे. तथापी कंपनीने जिल्हयात जवळपास २४२०६ में. टन खतांचा कमी पुरवठा केला आहे. पैकी युरीया खताचा ६६७८ मे.टन कमी पुरवठा केला आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here