देवळा : संपूर्ण देवळा तालुक्यात तसेच तालुक्यातील गावात रासायनिक खते मिळणे दुरापास्त तसेच चढ्या भावाने विक्री होत असल्याची तक्रार प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने तालुका कृषी अधिकारी व निवासी नायब तहसीलदारांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनाचा आशय असा कि, गेल्या काही दिवसांपासून देवळा तहसील अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये कृत्रीम नैसर्गिक खाद्य टंचाई निर्माण झाली असून, संबंधित खाद्य विक्रेते गोपणीय पद्धतीने चढ्या भावाने नैसर्गिक खाद्य विक्री करत आहेत. याबाबत कृषी विभाग प्रशासनाने या गोष्टींची दखल घेऊन तालुक्यातील प्रत्येक गावात खाद्य विक्रेते दुकानांवर धाडी टाकून कारवाई करणे आवश्यक गरजेचे आहे . बळीराजा शेतकरी संबंधित खाद्य विषयी मेताकुटीस आलेला आहे. खाद्य दुकानात उपलब्ध असुनही व्यापारी संगनमताने शेतकऱ्यांना बळीचा बकरा बनविण्यात मग्न आहेत. याची तात्काळ दखल घेऊन जागेवर पंचनामा करून कारवाई करावी ,अन्यथा प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवार (दि 13) फ्रेब्रुवारी रोजी जुने तहसील कार्यालय पाच कंदिल देवळा समोर बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे .
निवेदनावर जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा जाधव, तालुका अध्यक्ष संजय दहिवडकर, नानाजी आहेर , बापू देवरे , शशिकांत पवार, हरीसिंग ठोके, भाऊसाहेब मोरे, दशरथ पुरकर, विनोद आहेर , सुनिल पगार , राजकुमार यशवंते, कृष्णा पवार , विश्वनाथ सोनवणे , अशोक देवरे , गोविंदा वाघ, रमेश सोनवणे , ज्ञानेश्वर पवार , राकेश देवरे ,भगवान पवार , बापू देवरे , निलेश बच्छाव आदींच्या सह्या आहेत .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम