Diwali 2023 | हिंदू पंचांगानुसार, कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्ष त्रयोदशीला धनत्रयोदशी साजरी केली जाते. या दिवशी देवी लक्ष्मी व आरोग्याची देवता धन्वंतरीची पूजा केली जाते. यंदा १० नोव्हेंबरला धनत्रयोदशी आहे. हा दिवस यावर्षी ग्रहमानानुसार देखील अत्यंत अनुकूल असणार आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार, यावर्षी धनत्रयोदशी च्या दिवशी चंद्र हा कन्या राशीत गोचर करणार आहे. कन्या राशीत शुक्र देव आधीच विराजमान आहेत. शुक्र व चंद्राच्या एकत्र येण्याने १० नोव्हेंबरला दुर्मिळ असा कलात्मक राजयोग निर्माण होणार आहे. त्यात हस्त नक्षत्रात हा राजयोग येत असल्याने ह्या तीन राशींच्या लोकांवर लक्ष्मी देवीची विशेष कृपा होणार आहे.
मकर रास
हा दुर्मिळ कलात्मक राजयोग मकर राशीसाठी विशेष असणार आहे. शनी व गुरुदेवाचा उत्तम पाठबळ असल्याने या राशीच्या व्यक्तींना धनलाभ होईल. प्रत्येक कामात यश मिळेल. कामाच्या ठिकाणी अतिरिक्त महत्त्वाची जबाबदारी मिळणार आहे.
नोकरी-व्यवसायात मिळालेल्या ह्या नव्या जबाबदाऱ्यांना तुम्ही पूर्ण न्याय द्याल. विद्यार्थ्यांसाठी हा राजयोग यश व प्रगती घेऊन येणार आहे. पुढील उच्च शिक्षणासाठी परदेशी जायचे असल्यास ही संधी सोडू नका. कामासंबंधात तुमचे निर्णय योग्य ठरणार आहेत. यात प्रवासाचे योगही असणार आहेत. दरम्यान, अचानक तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता आहे.
Nashik News | प्रत्येक गावाला पाणी मिळालं नाही तर बघा; आ. डॉ. राहुल आहेरांचा अधिकाऱ्यांना इशारा
कन्या रास
दुर्मिळ कलात्मक राजयोग हा कन्या राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय शुभ असणार आहे. यामुळे याकाळात तुमच्यातील कलागुणांना वाव मिळेल. नोकरी-व्यवसायात महत्वाचे निर्णय घेताना तज्ज्ञ मंडळींचा सल्ला तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. आत्मविश्वास दुप्पटीने वाढेल.
या काळात तुम्हाला मोठा आर्थिक लाभ होईल. तुमच्या बँक बॅलेन्स घसघशीत वाढ होणार आहे. मानसिक आरोग्यही या काळात सुधारणार आहे. जोडीदारासोबत आनंददायी वेळ घालवता येणार आहे. तुम्हाला याकाळात जोडीदाराकडून प्रचंड पाठबळ मिळू शकतं, आणि यातून धनाचे दार सुद्धा उघडेल .
कर्क रास
कर्क राशीच्या भाग्यस्थानात कलात्मक राजयोग हा अत्यंत प्रभावी असणार आहे. हा योग कुंडलीत नवम स्थानात असल्याने खूप भाग्यशाली असणार आहे. जमीन जुमल्या संबंधातील कामे मार्गी लागतील. जुनी येणीदेखील येतील. कलात्मक योगामुळे तुमची अनेक प्रलंबित कामं मार्गी लागतील. तुमच्या आरोग्यात सुधारणा होईल. या काळात एक सकारात्मक ऊर्जा तुमच्यामध्ये असेल. आणि तुमची हीच सकारात्मक ऊर्जा अडचणीवर मात करण्यात यशस्वी होणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम