
देवळा : पैशावर विश्वास ठेवण्यापेक्षा ठेवीदारांनी विश्वासावर पैसे ठेऊन संस्थेच्या ठेवींमध्ये वर्षभरात वाढ झाली असून, थकबाकीदार सभासदांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे .थकबाकीदारांनी वेळेत कर्जाची परतफेड करून संस्थेला सहकार्य करावे असे आवाहन श्री रामराव आहेर नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन विनोद शिंदे यांनी केले . या पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी दि २८ रोजी चेअरमन विनोद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरण सम्पन्न झाली . यावेळी ते बोलत होते .

अहवाल वाचन व्यवस्थापक रविंद्र देवरे यांनी केले .
शिंदे पुढे म्हणाले की , संस्थेच्या वतीने लवकरच मोबाईल बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून, यूपीआय मार्फत सभासद व कर्जदारांना आपल्या खात्यात व्यवहार करणे सोपे होणार असून.शाखा विस्तार करण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे, माजी चेअरमन पवन अहिरराव ,नितीन शेवाळकर ,भाऊसाहेब आहेर, पुंडलिक आहेर, दावल आहेर आदींनी चर्चेत भाग घेतला .याप्रसंगी सभासद पाल्यांचा गुणगौरव करण्यात आला .
यावेळी चेअरमन विनोद शिंदे ,व्हा चेअरमन दीप्ती आहेर ,संचालक सुभाष आहेर, डॉ वसंतराव आहेर,दुलाजी आहेर,सतीश राणे,डॉ अविनाश आहेर, रजत आहेर,अरुण खरोटे,पंकज आहेर, वंदना आहेर,पंडित चंदन ,विठ्ठल गुजरे,व्यवस्थापक रविंद्र देवरे आदींसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते .सभा यशस्वीतेसाठी क्लर्क राजेंद्र देवरे,अरुण जाधव,ज्ञानेश्वर मेतकर, रितेश शिंदे ,शंकर नवरे प्रमोद शेवाळकर ,बाळकृष्ण भामरे यांनी विशेष परिश्रम घेतले .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम