देवळा ; रामेश्वर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी केवळ गांगुर्डे यांची तर उपसरपंचपदी सुनील पगार यांची बिनविरोध निवड करण्यात आली .रामेश्वर ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक ४ ऑगस्ट रोजी पार पडली .

सरपंच ,उपसरपंच पदासाठी आज गुरुवारी (२५) रोजी निवडणूक घेण्यात आली . निवडणूक निर्णय अधिकारी दीपक गवारी यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली. निर्धारित वेळेत सरपंच पदासाठी केवळ शंकर गांगुर्डे व उषा गोविंद जाधव या दोघांचे अर्ज प्राप्त झाले .
उपसरपंच पदासाठी सुनील पोपट पगार यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने उपसरपंचपदी सुनील पगार यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली तर सरपंच पदी केवळ गांगुर्डे यांची सर्वाधिक मताधिक्याने निवड झाली .
यावेळी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य अंबु गांगुर्डे ,शितल पगार, जया नंदू पगार उपस्थित होते.माजी उपसरपंच युवा नेते विजय पगार यांच्या नेतृत्वाखाली पॅनलकडे स्पष्टबहुमत असल्याने त्यांच्या गटाचे सरपंच व उपसरपंच निवडण्यात आले .
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अण्णा पगार, माणिक बापू पगार, उत्तम पगार, चिंतामण पगार, किशोर पगार ,गोविंद पगार ,सुरेश बोरसे, गुलाब पगार ,भास्कर पगार, कारभारी पगार, अंबादास पगार ,बाळासाहेब पगार, गणेश पगार, वैभव पगार ,अनिल पगार ,नंदू पगार, नितीन पगार , भरत कांदळकर ,शरद झाडे ,विलास माळी ,रामदासना पगार आदींनी अभिनंदन केले .
शेवटी नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांच्यासह निवडणूक निर्णय अधिकारीतसेच इतर सर्व कर्मचाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला . याकामी ग्रामसेविका श्रीमती वैशाली येळीज, शिपाई अशोक खैरनार यांचे सहकार्य लाभले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम