देवळा | सोमनाथ जगताप
तालुक्यातील किशोर सागर धरणातून आज मंगळवार दि. २६ रोजी सकाळी ११ वाजता चणकापुर उजवा वाढीव कालव्याला मविप्रचे संचालक विजय पगार यांच्या हस्ते जल् पुजन करण्यात येऊन पुर्व भागातील परसुल धरणा कडे पाणी सोडण्यात आले . यामुळे पूर्व भागातील कालवा लाभक्षेत्रील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे . तालुक्यात यावर्षी अत्यल्प प्रजनवृष्टी झाल्याने संपूर्ण नदी नाले छोटे मोठे पाझर तलाव कोरडे ठाक पडले आहेत .
खरीप हंगाम पूर्णतः वाया गेल्याने शेतकरी वर्ग चिंताक्रांत बनला आहे .चारा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे . चणकापूर धरणाच्या लाभक्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने चणकापूर धरणातून गिरणा नदीपात्रात विसर्ग सोडण्यात आला असून ,गेल्या पंधरा दिवसांपासुन चणकापूर उजव्या कालव्याद्वारे तालुक्यातील किशोर सागर धरणात पाणी सोडण्यात आल्याने ते जवळपास ९७ टक्के भरले आहे . यामुळे वाढीव कालव्याला पाणी सोडण्यात यावे अशी मागणी पूर्व भागातील नागरिकांनी पाटबंधाराने विभागाकडे केली होती . त्यानुसार आज मंगळवारी दि २६ रोजी सकाळी ११ वाजता रामेश्वर धरणातून उजव्या वाढीव कालव्याला पाणी सोडण्यात आले असून ,त्याद्वारे दहिवड व परसूल धरण भरून देण्यात यावे ,अशी मागणी भाजपचे जिल्हा नेते केदा आहेर यांनी गेल्या आठवड्यात तहसीलदार विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली होती .
या वाढीव कालव्याला पाणी सोडण्यात आल्याने पूर्व भागातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे .
यावेळी उमराणे बाजार समितीचे सभापती प्रशांत देवरे , उपसभापती मिलिंद शेवाळे , माजी सभापती विलास देवरे, देवानंद वाघ ,दिपक निकम , संदिप देवरे ,शिवा देवरे ,राजेंद्र देवरे ,निंबा देवरे ,भरत देवरे, बंडूनाना देवरे, काशिनाथ देवरे ,वाखारीचे उपसरपंच मंगेश आहेर , खुंटेवाडीचे उपसरपंच राजीव पगार , जिभाऊ देवरे, माणिक आप्पा ,राकेश देवरे ,जगन्नाथ देवरे , संजय दहिवडकर ,पाटबंधारे विभागाचे सहायक अभियंता नितीन बाविस्कर रवी आहेर आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम