Ram Temple | कीर्तन केसरी ह.भ.प. धोंडगे महाराजांना आयोध्या सोहळ्याचे निमंत्रण

0
15
Ram Temple
Ram Temple

Ram Temple | सोमनाथ जगताप – देवळा | देवळा येथील कीर्तन केसरी तसेच भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेश सहअध्यक्ष ह. भ. प. संजय नाना धोंडगे महाराज यांना येत्या २२ जानेवारी रोजी होणाऱ्या अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी निमंत्रीत करण्यात आले आहे. देशभरातून काही निवडक आणि प्रमुख मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे त्यातच धोंडगे यांचाही समावेश आहे.

Lok Sabha 2024 | संजय राऊतांमुळे काँग्रेसचा बडा नेता शिंदे गटात

निमंत्रणाचे पत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धोंडगे महाराज यांना दिले असून, या प्रसंगाला ‘याचि देहा याचि डोळा’ अनुभवण्याची आपल्याला संधी मिळतेय, याचा मला अतिशय आनंद आहे. देशभरातून ज्या निवडक आणि प्रमुख मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे, त्यात आपला समावेश आहे. हे आपल्या सेवेचे आणि पुण्यकर्माचे फळ आहे. यापुढील काळात सुद्धा देव, देश आणि धर्मासाठी आपले मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष सहभाग आवश्यक असणार आहे. आपली समर्थ साथ आणि आशिर्वाद असेच असू द्या, असे नमूद करण्यात आले आहे.

Ram Temple | कोण आहेत ह. भ. प. संजय नाना धोंडगे महाराज?

देवळा येथील कीर्तन केसरी तसेच भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेश सहअध्यक्ष ह. भ. प. संजय नाना धोंडगे महाराज हे त्रंबकेश्वर येथील संत निवृत्ती नाथ देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष असून, संपुर्ण राज्यभरात धोंडगे यांनी आपल्या कीर्तन सेवेतून वारकरी सांप्रदायातील माऊलींना मार्गदर्शन करून मोठ्या प्रमाणावर हा परिवार वाढवलेला आहे.

Ram Temple | नाशिकच्या तब्बल ३०० दिव्यांग मुलांची प्रभू रामांसाठी ‘खास भेट’

धोंडगे महाराजांकडे होत असलेल्या अखंड हरीनाम सप्ताहातही नामवंत कीर्तनकार हजेरी लावत असतात. अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याच्या भव्यदिव्य कार्यक्रमासाठी धोंडगे यांना निमंत्रित करण्यात आल्याने कसमादे परिसरातून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here