देवळा ; पोलीस खात्यातील पदाधिकारी व कर्मचाऱ्यांना कोणत्याही सण ,उत्सवाला सुट्टी माहीत नसते .रक्षाबंधन तसेच भाऊबीज म्हणजे भावा बहिणीचे अतूट बंधन मात्र या बंधनापासून पोलीस खात्यातील पदाधिकारी व कर्मचारी दूर झाल्याची खंत व्यक्त या विभागातील कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
आज देवळा पोलीस ठाण्यात रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला .यावेळी महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक सह इतर कर्मचाऱ्यांना हेच आपले रक्षक व हेच आपले भाऊ असून त्यांना राख्या बांधून देवळा पोलीस ठाण्यात रक्षाबंधन साजरे करण्यात आले . अनेक पदाधिकारी व कर्मचाऱ्यांना सण उत्सवासाठी इच्छा असतांना देखील घरी जाता येत नसल्याची खंत यावेळी व्यक्त करण्यात आली .
या कार्यक्रमास पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे ,पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ, विक्रांत कचरे , श्रावण शिंदे, हवालदार रामदास गवळी, पोलिस नाईक भास्कर सोनवणे, रुतीका कुमावत , महीला पोलीस नाईक ज्योती गोसावी, महीला काॅनस्टेबल माधुरी पवार, स्वाती चव्हाण, सफाई कामगार दिपक गोयेकर आदी उपस्थित होते .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम