महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे औरंगाबाद येथे सभेत यांनी मशिदींवरील लाऊडस्पीकरचा मुद्दा उपस्थित करत राज्यातील राजकारण हदरवून सोडले होते. औरंगाबाद येथील सभेत भडकाऊ भाषण नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. औरंगाबादेतील सिटी चौक पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला.
एकचा सुमारास औरंगाबाद येथून पोलिस महासंचालकांनी पत्रकार परिषद घेऊन कारवाईचे संकेत दिले आणि दुपारी अडीज वाजण्याच्या सुमारास औरंगाबाद पोलिसांनी ठाकरे यांच्याविरोधात गुन्ह्याची नोंद केली. 116, 117, 135, 153 अ अंतर्गत राज ठाकरे यांच्या विरोधात औरंगाबाद येथून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तसेच राज ठाकरे यांना नोटीस देण्यासाठी पोलिस त्यांच्या घरी जाणार आहेत.
सभेत पोलिसांनी त्यांना 16 अटी शर्थीचे पालन करण्यासाठी बजावले होते. त्यातल्या 12अटींचे उल्लंघन केल्याने राज ठाकरेंवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. . सरकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग करण्याचे कलम त्यांच्याविरोधात लावण्यात आले आहे. राज ठाकरे यांच्यावर कलम 149 ची नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांच्याबरोबर असलेल्या सभेच्या आयोजकांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम