मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर आजपासून मनसैनिकांकडून भोंग्यांच्या विरोधात आंदोलन सुरू झालं आहे. राज्याच्या विविध भागातून हनुमान चालीसा पठण पहाटेच्या वेळी अजान सुरु होताच मनसे कार्यकर्त्यांकडून मशिदींसमोर करण्यात आलं आहे. त्यामुळे राज्यात खळबळ माजली असून भयावही परिस्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना ताब्यातही घेतलं आहे.
राज ठाकरेंच्या आदेशानांतर आता मनसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. काल रात्री पोलिसांनी मनसेच्या जवळपास 20 ते 25 कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं. राज ठाकरेंवर कारवाईची टांगती तलवार असतानाच त्यांनी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा एक जुना व्हिडिओ राज ठाकरेंनी ट्वीट केला आहे. राज ठाकरे यांनी हा व्हिडीओमध्ये शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
बाळासाहेबांच्या ट्विटरवरील व्हिडिओमध्ये बाळासाहेबांनी मशिदीवरील भोंग्याबाबत आक्रमक भूमिका मांडली आहे. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकाद्वारे मशिदीवरील भोंग्यांविरोधात भूमिका कायम ठेवल्याचे सांगितले.
त्यानंतर राज्यात ठिकठिकाणी मनसे कार्यकर्त्यांकडून हनुमान चालिसा पठण केलं जात आहे. तसेच, या पत्रात राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणार की शरद पवार यांचं ऐकणार, असा सवालही केला होता. माने सैनिकांच्या 25 ते 30 कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले असून यानंतर राज ठाकरे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम