कृषी प्रतिनिधी ; मान्सूनने महाराष्ट्राच्या वेंगुर्ल्यात हजेरी लावली असुन पुढील २ दिवसात रविवार दि.१२ पर्यंत सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली जिल्ह्यासह सह रत्नागिरी सातारा व सोलापूर जिल्ह्याच्या काही भागात मान्सून आगेकूच करण्याची अनुकूलता दर्शवत असल्याची माहिती हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे.
पुढील ५ दिवस मुंबईसह कोकणात झटक्याखाली वाहणारा वारा, वीजा, गडगडाटसह जोरदार अवकाळी पूर्व मोसमी पावसाची शक्यता जाणवत असल्याचे देखील खुळे यांनी सांगितले, वातावरणाच्या पाऊसाची दि.१२-१३(रविवार – सोमवारी ) रोजी मध्य महाराष्ट्रातील खान्देश सह नाशिक नगर पुणे जिल्ह्यात तर नंतरच्या दोन दिवसानंतर मराठवाड्यातील जिल्ह्यातही शक्यता जाणवत असून शेतकऱ्यांनी यामुळे समाधान व्यक्त केलं आहे.
संपूर्ण विदर्भात पुढील ५ दिवस गारपीटसह वातावरण व पूर्वमोसमी पावसाची शक्यता जाणवते. तसेच येत्या ५ दिवसातील अवकाळी पूर्वमोसमी पावसाच्या वरील सर्व घडामोडीनंतरच महाराष्ट्रात मान्सूनची झेप व त्याची सक्रियता स्पष्ट होण्याचे संकेत आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम