Rahul Gandhi | नशिक कोर्टाने ठोठावली राहुल गांधींना नोटिस

0
17
Rahul Gandhi
Rahul Gandhi

Rahul Gandhi |  राज्याच्या राजकारणात सध्या रोज काहीतरी नवीन घटना घडत आहेत. कधी टिका, तर कधी थेट हत्या आणि गोळीबार. त्यातच आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांना नशिक जिल्हा न्यायालयाने नोटिस पाठवली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याच्या विरोधात नाशिक मधील सावरकरप्रेमींकडून नाशिक जिल्हा न्यायालयात खटला दाखल करण्यात आला असून, त्यानूसार नाशिक न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना नोटीस ठोठावली आहे.

दरम्यान, याप्रकरणी आता येत्या १६ मार्च रोजी सुनावणी पार पडणार आहे. सावरकरांच्या विरोधातील वक्तव्यांमुळे राहुल गांधी हे वादात सापडले आहेत. गेल्या दोन दिवसांपूर्वीच गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जातीचा उल्लेख केल्याने भाजपच्यावतीने देशभरात राहुल गांधींच्या विरोधात आंदोलन करण्यात आले होते. तर, याआधी त्यांनी सावरकरांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यामुळेही मोठा वाद निर्माण झाला होता.

Nikhil Wagle | ज्येष्ठ पत्रकार निखील वागळेंच्या गाडीवर का झाला हल्ला..?

Rahul Gandhi | सावरकरांनी स्वतः ‘स्वतंत्र्यवीर’ ही पदवी.. 

राहुल गांधींच्या विरोधात नाशिकमधील सावरकर प्रेमी आणि निर्भय फाउंडेशनचे अध्यक्ष देवेंद्र भुतडा यांच्याकडून हा  हा दावा दाखल करण्यात आला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हिंगोली आणि अकोला येथे भर सभेत सावरकर यांच्यावर टीका केली होती. सावरकर हे दोन तीन महिने जेलमध्ये असताना त्यांनी त्यांचे सदाशिव रानडे नामक एका सहकार्‍यामार्फत स्वतःचे जीवन चरित्र लिहून घेतले होते. तसेच त्यांनी स्वतःला ‘स्वातंत्र्यवीर’ अशी पदवी बहाल करून घेतली होती अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती. दरम्यान, यासंदर्भात भुतडा यांनी अ‍ॅड. मनोज पिंगळे यांच्यामार्फत राहुल गांधी यांना ही नोटीस बजावली होती. या नोटीसीला प्रतिसाद न दिल्याने त्यांनी आता याबाबत नाशिक जिल्हा न्यायालयात दावा दाखल केला आहे.

Bharat Ratna | …तर बाळासाहेब ठाकरेंनाही भारतरत्न जाहीर करावा

अंदमान येथे स्वातंत्र्यवीर सावरकर हे तब्बल बारा वर्षे कारावास भोगत होते. तर, ६ जानेवारी १९२४ रोजी त्यांची येरवडा कारागृहातून सुटका झाली होती. त्यामुळे राहुल गांधी यांनी केलेले हे दावे चुकीचे आहे. स्वातंत्र्यवीर ही पदवी त्यांनी स्वतः त्यांच्या सहकार्‍याकडून लिहून घेतली याचे कोणतेही पुरावे नाहीत. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर हे हयात असताना भाजपची स्थापना देखील झालेली नव्हती. त्यामूळे राहूल गांधी यांनी केलेले हे आरोप तथ्यहीन आहेत. तसेच यामुळे सावरकरप्रेमींच्या भावना दुखावल्या असून, त्यामुळे आता राहुल गांधी यांनी माफी मागावी किंवा त्यांनी केलेल्या व्यक्तव्याबाबत पुरावे सादर करावे, अशी मागणी भुतडा यांनी नशिक जिल्हा न्यायालयात केली आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here