pune University: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात रखडलेल्या प्राध्यापक भरतीला आता मुहूर्त लागणार आहे. तब्बल १३३ सहाय्यक प्रधापकांची भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. ही भरती कंत्राटी तत्वावर केली जाणार असल्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे. निवड होणाऱ्या उमेदवारांची नियुक्ती ३१ मे २०२४ पर्यंत असेल. अर्जाची अंतिम मुदत २० जुलै ही आहे.
Nashik News: नाशिकमध्ये अतिरेक्यांचा शिरकाव? काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घ्या
पुणे विद्यापीठात प्राध्यापकांच्या अनेक जागा रिक्त आहेत. गेल्या अनेक दिवसांपासूंन ही भरती प्रक्रिया रखडलेली आहे. अनेक विभागात प्राध्यापकच नसल्याने काही मोजक्या प्राध्यापकांवर शिकवण्याचा भार येतो. विद्यापीठातील प्राध्यापकांच्या तब्बल ५५ टक्के जागा रिकाम्याच आहेत.या जागेंवर भरती करण्यात यावी अशी मागणी होत होती. सोबतच शासनाकडून प्राध्यापक भरती प्रक्रिया राबवली जात नसल्याने शैक्षणिक कामकाजात अडथळे येत होते.दरम्यान, देशातील विद्यापीठांच्या दर्जा यादीत देखील विद्यापीठाचा दर्जा घसरला आहे. त्यातच आता नवीन शैक्षणिक धोरण लागू होणार आहे. त्यामुळे अखेर प्राध्यापक भरतीचा निर्णय विद्यापीठ प्रशासाने घेतला आहे. सहाय्यक प्राध्यापकांच्या तब्बल १३३ जागांसाठी भरती होणार आहे.गेल्यावर्षीही विद्यापीठाने विद्यापीठ निधीतून कंत्राटी प्राध्यापकांची नियुक्ती केली होती यंदाही ही भरती केली जाणार आहे.
Bacchu kadu : आणि म्हणून मला गुवाहाटीला जावं लागलं ; नाराज बच्चू कडूंनी बोलून दाखवली मनातली खदखद
यासंदर्भात परिपत्रक विद्यापीठाने प्रसिद्ध केले असुन ही भरती विज्ञान आणि तंत्रज्ञान, मानवविद्यान, आंतविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेतील चाळीस शैक्षणिक विभागांतील जागांसाठी राबवली जाणार आहे. या पदांसाठी दरमहा ४० हजार रुपये वेतन दिले जाणार आहे. निवड होणाऱ्या उमेदवारांची नियुक्ती ३१ मे २०२४ पर्यंत असेल या जागांसाठी अर्ज करण्याची मुदत २० जुलै आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम