संस्कृतीच्या माहेर घरात अश्लीलतेचा कळस ; तीन दिवसांच्या ‘सेक्स तंत्र’ कोर्सची जाहिरात व्हायरल

0
26

पुणे: हे शहर तसे संस्कृतीचे माहेर घर आहे मात्र शहरात सध्या सोशल मीडियावर एका शेअर होणाऱ्या जाहिरातीने एकच खळबळ उडवून दिली आहे. त्याला कारणही तसेच आहे ज्या पुण्याला सांस्कृतिक शहर म्हणतो त्या पुण्यात सद्या चालले तरी काय हा प्रश्न निर्माण होत आहे. यावेळी हद पर केली असून यंदाच्या नवरात्रीच्या निमित्ताने ‘सेक्स तंत्र’ (Pune Sex Tantra Advertise) या नावाने तीन दिवसांचा कोर्स आयोजित केला असल्याची धक्कादायक व लाजिरवाणी जाहिरात व्हायरल झाली आहे. 1 ते 3 ऑक्टोबर असे दरम्यान पुण्यातील कॅम्प भागात हा कोर्स आयोजित करण्यात आला होता. ही जाहिरात कोणी सोशल मीडियावर पसरवली याचा शोध पुणे सायबर पोलीस घेत असून दोषींवर कठोर कारवाई केली जाण्याची शक्यता वाढली आहे.

नेमक या जाहिरातीत काय ?
पुण्यात घडलेल्या प्रकाराने सोशल मीडियात जाहिरातीचा धुमाकूळ सुरू आहे. यंदाच्या नवरात्री निमित्ताने कॅम्प परिसरात तीन दिवसांचा सेक्स तंत्र या नावाने एका कोर्सचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जाहिरातीमध्ये सांगण्यात आली. याठिकाणी लाईव्ह सेशन घेतले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. या कोर्समधे सहभागी होण्यासाठी प्रत्येक व्यक्तीकडून तीन दिवसांसाठी प्रत्येकी 15 हजार रुपये फी घेतली जाणार आहेत.

पुण्यात काम करणाऱ्या ‘सत्यम शिवम सुंदरम फाउंडेशन’ या संस्थेतर्फे या कोर्सचं आयोजन करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच जाहिरातीबरोबर एक क्यूआर कोड देखील देण्यात आला असून या द्वारे पैसे जमा केले जाणार आहेत.

या कोर्समधे कोणते कोर्स शिकवले जाणार ?
– वैदिक सेक्स तंत्र
– डिव्हाईन फेमिनाईन मस्क्युलाईन एंबॉडीमेंट
– चक्र अॅक्टिव्हेशन
– ओशो मेडिटेशन

पोलिस करताय कसून तपास
पुणे पोलिसांची झोप उडाली असून या सेक्स कोर्सला पोलिसांनी परवानगी दिली आहे की नाही याबद्दल स्पष्टटा आलेली नाही. दरम्यान, पुणे सायबर पोलिसांनी याची चौकशी सुरु केली असून या कोर्सच्या आयोजकांची माहिती पोलीस घेत आहेत. तसेच या अशोभनीय जाहिरातीत देण्यात आलेल्या नंबरवरुन आयोजकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत. ही जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल कशी झाली याचाही सायबर पोलीस कसून शोध घेत आहेत.

या प्रकरणानंतर अतिशय तिखट प्रतिक्रिया आल्या आहेत, हिंदू महासंघाचे आनंद दवे यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, “Sex tantra या नावाने पुण्यात एक गलिच्छ आणि विकृत व्यवसाय करण्यात आला आहे. विशेष म्हणजे लाजिरवाणी गोष्ट ही आहे की नवरात्री स्पेशल असं नाव विकृत प्रकरणाला दिले आहे. हा हिंदूंचा आणि त्यांच्या दैवतांचा अपमान आहे. हे हिंदू महासंघ कदापी सहन करणार नाही. ना आयोजकांचा पत्ता व नावे, तसेच होणाऱ्या कार्यक्रमाचा पत्ता किंवा इतर कोणतीही माहिती यामध्ये नाही, यावरूनच हे सर्व फसवं, घाणेरडं आणि एका नवीन विकृत संस्कृतीला जन्म देणारे ठरणार असून हिंदू महासंघ हे होऊ देणार नाही.”


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here