Pune Crime | भाडेकरुनेच केला घात; ६ वर्षे अल्पवयीन मुलीवर केले अत्याचार

0
24
Rape Case
Rape Case

Pune Crime | ‘विदयेचे माहेर’ असलेल्या पुण्यात सध्या महिलांच्या बाबतीतील अनेक धक्कादायक घटना ह्या समोर येत आहेत. दरम्यान, यामुळे पुण्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न हा ऐरणीवर आला असून, याबत अनेक लोकप्रतिनिधी तसेच नगरिकांकडूनही वेळोवेळी आवाज उठवले जात असून, अजूनही या गुन्ह्यांची संख्या कमी होत नाही. दरम्यान, अशीच एक हृदयद्रावक घटना ही पुन्हा एकदा पुण्यातून समोर आली आहे. (Pune Crime)

दरम्यान, या प्रकरणी घरमालकाच्या अल्पवयीन मुलीवर भाडेकरू गृहस्तानेच लैंगिक अत्याचार केले असल्याची घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक म्हणजे ह्या भाडेकरुने तब्बल सहा वर्ष ह्या अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, आता ह्या भाडेकरूबाबत माहिती कळाली असून, ह्या सर्व घटनेत त्याच्या सोबत त्याची बायको देखील त्याला पूर्ण सहकार्य करत होती. आता ह्या घटनेत आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून, ह्या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत. (Pune Crime)

Mumbai Crime | धक्कादायक..! ६४ वर्षीय महिलेवर बलात्कार करत मारहाण

पुणे शहरातील सोमवार पेठ ह्या परिसरातील ही घटना असून, ह्या प्रकरणातील आरोपी असलेला समीर शेख तसेच त्याची पत्नी हे दोघे ह्या पीडित मुलीच्या वडिलांच्या मालकीच्या असलेल्या भाड्याच्या घरात राहत होते आणि याच दरम्यान आरोपी समीर शेख याने पीडित मुलीसोबत ओळख वाढवली आणि त्यानंतर तिच्या सोबत मैत्री करत तसेच तिच्यासोबत ओळख वाढवत त्याने तिच्यासोबत काही फोटो काढलेले होते.

दरम्यान, हेच फोटो दाखवत ते फोटो सोशल मिडियावर व्हायरल करेल असे धमकावत त्याने त्या पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार केले आणि तिला मारहाण देखील केली. तसेच तिच्यावर जबरदस्ती करत त्याने तिच्यावर अमानुष अत्याचार केल. तेही एकदा नव्हे तर, तब्बल सहा वर्षे वारंवार तिला धमकी देत तिचा शारिरिक तसेच मानसिक रित्या वेळोवेळी छळ केला.(Pune Crime)

Malegaon | धक्कादायक! मालेगाव महापालिकेची 3 गोण्या भरून कागदपत्रं रस्त्यावर

दरम्यान, पीडित अल्पवयीन मुलगी ही हा सर्व अमानुष प्रकार हा सहन करत होती. तसेच या गुन्ह्यात आरोपीची पत्नीही सामील होती. ह्या संबंधित आरोपीच्या पत्नीने पीडित मुलीचा व तिच्या पतीचे फोटो हे तिच्या कुटुंबियांना दाखवत तिला जीवे मारण्याचीही धमकी दिली. ह्या बलात्कारी पती-पत्नीने सहा वर्ष त्या अल्पवयीन पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार करत तिचा शारीरिक छल केला. (Pune Crime)

दरम्यान, या प्रकरणी पीडीतेने पोलिसांत तक्रार दिली असून, ह्या तक्रारीवरून आता आरोपी सिजु समीर शेख आणि सोबतच सोफियाना सिजू शेख या दोघांवर समर्थ पोलीस ठाण्यात बलात्कार आणि पॉक्सो यानुसार गुन्हा दाखल केलेला आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here