गायक मुसेवाला हत्येचे आता ‘पुणे कनेक्शन’; काय आहे या प्रकरणाचा पुण्याशी संबंध?

0
33

द पॉईंट नाऊ ब्युरो : पंजाबमधील सुप्रसिद्ध गायक मुसेवाला याच्या हत्या प्रकरणात एक नवे वळण आले आहे. मुसेवाला हत्येचे कनेक्शन महाराष्ट्रातील पुण्यापर्यंत असल्याचे समोर आले आहे.

पंजाबमधील 29 वर्षीय गायक मुसेवाला याची काही दिवसांपूर्वी भर दिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. पंजाब सरकारने त्याची सुरक्षा कमी केल्यानंतरच हा प्रकार घडल्याने, पंजाब सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. आता या हत्या प्रकरणात आरोपी असलेले संतोष जाधव आणि सौरव महाकाल यांचं पुण्याशी कनेक्शन असल्याचं सांगण्यात येत आहे.

मुसेवाला हत्या प्रकरणात आत्तापर्यंत आठ जणांची छायाचित्रे समोर आली आहेत. त्यात मुसेवाला याच्या वडिलांनी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेत, मुसेवाला हत्या प्रकरण केंद्रीय तपास यंत्रणांकडे देण्याची मागणी केली होती.

दरम्यान, या प्रकरणात नाव समोर आलेला संतोष जाधव हा पुणे मंचर येथील ओंकार उर्फ राण्या बाणखेले या अट्टल गुन्हेगाराच्या हत्या प्रकरणात प्रमुख आरोपी आहे. गेल्या ऑगस्ट महिन्यात संतोषने भरदिवसा ओंकारची गोळ्या झाडून हत्या केली होती. यामुळे पोलीस त्याचा शोध घेत आहेत. त्यात आता संतोषचे नाव मुसेवाला हत्या प्रकरणात देखील समोर आले आहे. मुसेवाला याच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिष्णोई याने स्वीकारली होती. मात्र आता या प्रकरणात नाव समोर आलेले संतोष जाधव आणि सौरव महाकाल हे दोन्ही पुणे येथील राहणारे असल्याचे सांगण्यात येत असल्याने, या तपासाची चक्रे आता अजून कुठे फिरतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here