Prohibition of alcohol देवळा तालुक्यातील खडकतळे ग्रामपंचायतीने गुरुवारी दि ६ रोजी विशेष ग्रामसभा आयोजित करून एकमुखाने दारूबंदीचा ठराव समत केला.Prohibition of alcohol
खडकतळे ता देवळा गावात गावठी दारूचा सुळसुळाट वाढला असून, तरुण वर्ग या व्यसनाकडे आकर्षित झाल्याने महिला वर्गाकडून गावात दारू बंदी झाली पाहिजे अशी मागणी करण्यात आली होती. त्याचप्रमाणे गावात जुगार (पत्ते) खेळण्याचे देखील प्रमाण देखील वाढले असून , कामधंदा सोडून बहुतांश लोक पत्ते खेळत बसतात .अशीही ओरड होऊ लागल्याने तोही प्रकार बंद करण्याचा ठराव यावेळी करण्यात आला. या निर्णयाचे महिला वर्गाकडून स्वागत करण्यात आले. यापुढे गावात दारू विकणे ,पिणे व पत्ते खेळताना आढल्यास दंड व कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. यामुळे अवैद्य रित्या व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत .Prohibition of alcohol
विशेष ग्रामसभा प्रसंगी पोलीस पाटील हेमंत पगार,सरपंच शकुंतला कवर, उपसरपंच राजश्री पवार ,माजी सरपंच पोपट पगार,दिनकर सूर्यवंशी, कारभारी सोनवणे, दशरथ पगार,बन्सी सोनवणे,दयाराम पगार ,विकास सोसायटीचे चेअरमन राजेंद्र पगार,अभिजित भामरे,प्रियदर्शन पवार,नामदेव भामरे,केशवProhibition of alcohol कुवर,दादाजी कुवर,प्रकाश आहेर, अरुण हिरे,मनोज हिरे,सजन पवार ,कौतिक आहेर,ग्रामसेवक सुदर्शन बच्छाव आदींसह ग्रामपंचायत सदस्य, विकास सोसायटीचे संचालक ,ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.Prohibition of alcohol
खडकतळे ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या दारू बंदी ठरावसाठी विशेष ग्रामसभेला उपस्थित सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ आदी
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम