Pm modi in pune : पंतप्रधान मोदी पुण्यात दाखल ; असा असेल आजचा दौरा

0
18

Pm modi in pune : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. आज विविध कामांचा शुभारंभ त्यांच्या हस्ते केला जाणार आहे. काही वेळातच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यामध्ये दाखल होणार असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार राज्यपाल बैस, पुण्याचे पालकमंत्री हे त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित झाले आहेत.

पुणे कृषी महाविद्यालय परिसरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हेलिकॉप्टर उतरणार असून या ठिकाणी त्यांचं जल्लोषात स्वागत केले गेले. दरम्यान परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा फौज फाटा तैनात करण्यात आलेला आहे. यामुळे संपूर्ण परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झालेल आहे.

पुण्यामध्ये आगमन झाल्यानंतर सर्वप्रथम पंतप्रधान हे पुण्यातील सुप्रसिद्ध असलेल्या दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेणार असून या ठिकाणी त्यांच्या हस्ते महाआरती देखील पार पडणार आहे. यानंतर अकरा वाजेच्या सुमारास लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येईल. एक वाजेच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे मेट्रो टप्प्यातील दोन कॉरिडोरच्या पूर्ण झालेल्या भागांवरील सेवांचा उद्घाटन करण्यासाठी मेट्रोला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.

पुणे शहरातील शिवाजीनगर, दिवाणी न्यायालय, पुणे महानगरपालिका कार्यालय, पुणे आरटीओ आणि पुणे रेल्वे स्टेशन सारखी महत्त्वाची ठिकाणे या मेट्रो द्वारे जोडली जाणार आहे. त्यामुळे देशभरातील नागरिकांना अत्याधुनिक आणि पर्यावरणपूरक मास रॅपिड शहरी वाहतूक व्यवस्था उपलब्ध होणार असल्याने आजच्या या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने पंतप्रधानांच्या संकल्पनेचा एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाल्याचा बोलला जात आहे.

कशी आहे मेट्रो स्थानिकांची रचना

पुणे मेट्रो टप्प्यातील दोन कॉरिडोरच्या पूर्ण झालेल्या भागांचे लोकार्पण आज पंतप्रधान मेट्रो ट्रेन ला हिरवा झेंडा दाखवून करणार आहेत. हे विभाग फुगेवाडी स्टेशन, सिविल कोर्ट स्टेशन, आणि गरवारे कॉलेज स्टेशन ते रुबी हॉल क्लिनिक स्टेशन पर्यंत आहेत. 2016 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा पार पडला होता. नवीन पट्ट्यांमुळे पुणे शहरातील महत्त्वाची ठिकाणे यामुळे जोडली जाणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून मेट्रोस्थानकांची रचना

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून प्रेरित होऊन या मेट्रोस्थानकांची रचना करण्यात आली आहे. छत्रपती संभाजी उद्यान मेट्रोस्थानक आणि डेक्कन जिमखाना मेट्रोस्थानकांची रचना ही महाराजांच्या सैनिकांनी परिधान केलेल्या “मावळा पगडी” अर्थातच “हेडगेअर” सारखी आहे. यामध्ये शिवाजीनगर भूमिगत मेट्रो स्टेशनची रचना ही अधिक वैशिष्ट्यपूर्ण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांची आठवण या रचनेवरून येते. या ठिकाणचा आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सिविल कोर्ट मेट्रो स्टेशन हे देशातील सर्वाधिक खोल असलेलं मेट्रो 33.1 मीटर हा त्याचा सर्वाधिक खोल बिंदू असून सूर्यप्रकाश थेट फलाटावर पडेल अशाप्रकारे या स्टेशनचा छत बनविण्यात आल आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here