दहिवड येथे वादळी वाऱ्यासह मान्सून पूर्व पाऊस ; छतावरील पत्रे उडाली

0
34
देवळा : दहिवड येथे बुधवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या मान्सून पूर्व पावसाने शेतातील घरावरील उडालेले पत्रे (छाया - सोमनाथ जगताप )

देवळा : तालुक्यातील दहिवड येथे ( दि १ ) रोजी वादळी वाऱ्यासह मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली . प्रचंड उकाड्याने तालुक्यातील जनता हैराण झाली असून ,दहिवड येथे दुपारी झालेल्या मान्सून पूर्व पावसाने जीवाची लाही लाही होणाऱ्या नागरिकांना यामुळे काहीसा दिलासा मिळाला .

देवळा : दहिवड येथे बुधवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या मान्सून पूर्व पावसाने शेतातील घरावरील उडालेले पत्रे (छाया – सोमनाथ जगताप )

गेल्या दोन दिन महिन्यापासून जनता वाढत्या उष्णतेने हैराण झाली असून , आता उन्हाळा संपला असल्याने नागरिक पावसाच्या प्रतीक्षेत आहे . हवामान खात्याने यावर्षी समाधान कारक पावसाचा अंदाज वर्तवला आहे . गेल्या वर्षी समाधान कारक पाऊस झाल्याने बहुतांश ठिकाणी पाण्याची टंचाई भासली नाही . मी अखेर तालुक्यातील रामेश्वर , वार्शी या धरणात मृत साठा शिल्लक असून , बहुतांश पाझर तलाव कोरडे ठाक पडली आहेत .यामुळे तालुक्यातील जनता आता दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे . दरम्यान , दहीवड येथे बुधवारी दुपारी झालेल्या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे सुपडू महिरे यांच्या छतावरील पत्रे उडून गेले . काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here