
देवळा ; देवळा तालुक्यात गांव तेथे शाखा स्थापन करून आगामी काळात गटतट विसरून सर्वसामान्य जनतेच्या समस्या मार्गी लावण्यासाठी पधाधिकाऱ्यानी झोकून घ्यावे . असे प्रतिपादन प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष शरद शिंदे यांनी येथे केले .

प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष शरद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी दि ९ रोजी देवळा येथील शरदराव पवार पतसंस्थेच्या सभागृहात पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली होती . यावेळी ते उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना बोलत होते . तालुक्यात पक्षाची ताकद वाढविण्यासाठी व पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री आमदार बच्चू कडू यांना अपेक्षित असलेली जनतेची कामे झाली पाहिजे .पधाधिकाऱ्यानी सर्वांना सोबत व विश्वासात घेऊन पुढील वाटचाल करावी . आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पक्ष संपूर्ण ताकदीनिशी लढणार असून ,सर्वांनी पक्ष देईल त्या उमेदवाऱ्याचा पाठीशी खंबीर पणे उभे राहून पक्षाचा झेंडा फडकविण्यासाठी परिश्रम घ्यावेत .
गाव तेथे शाखा स्थापन करून तळागाळातील जनतेपर्यंत पक्षाची ध्येय धोरणे पोहवा . असेहि शेवटी शिंदे यांनी सांगितले . यावेळी जिल्हाध्यक्ष शरद शिंदे यांचा खर्डे विकास सोसायटीचे संचालक कारभारी जाधव , माधव ठोंबरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . बैठकीस अजमन पठाण , कृष्णा जाधव , भाऊसाहेब मोरे , गणेश काकुळते , शशिकांत पवार , बापू देवरे , कारभारी जाधव , माधव ठोंबरे , लाला गांगुर्डे , तुषार जाधव , मनोज सोनवणे , दशरथ पुरकर , हरिशिंग ठोके आदी पधाधिकरी व कार्यकर्ते उपस्थित होते . प्रस्ताविक व आभार भाऊसाहेब मोरे यांनी मानले .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम