राष्ट्रीय पोषण माह अभियानात देवळा येथील एकात्मिक बालविकास प्रकल्प जिल्ह्यात प्रथम

0
7
देवळा येथील एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी जयश्री नाईक यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मानित करताना मुख्यकार्यकारी अधिकारी लीना बनसोड समवेत उप मुख्यकार्यकारी अधिकारी दीपक चाटे ,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ सुधीर पाटील ,मुख्य सेविका कल्याणी चव्हाण आदी (छाया - सोमनाथ जगताप )

देवळा ; राष्ट्रीय पोषण माह अभियानात देवळा येथील एकात्मिक बालविकास प्रकल्पाने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला असून, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या हस्ते येथील बाल विकास प्रकल्प अधिकारी जयश्री नाईक व मुख्य सेवकांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

देवळा येथील एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी जयश्री नाईक यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मानित करताना मुख्यकार्यकारी अधिकारी लीना बनसोड समवेत उप मुख्यकार्यकारी अधिकारी दीपक चाटे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ सुधीर पाटील मुख्य सेविका कल्याणी चव्हाण आदी छाया सोमनाथ जगताप

राष्ट्रीय पोषण माह अंतर्गत संपूर्ण भारतभर एक सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीमध्ये राष्ट्रीय पोषण माह अभियान राबविण्यात येते . यानिमित्ताने एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत येणाऱ्या अंगणवाडी केंद्र स्तरावर विविध पोषणाशी संबंधित कार्यक्रम घेऊन जास्तीत जास्त लोकांचा सहभाग घेऊन त्याची पोर्टलवर नोंद करण्यात आली आहे. मागील वर्षी देवळा येथील एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प अंतर्गत तालुकाभर विविध कार्यक्रम घेऊन पोर्टलवर जास्तीत जास्त कार्यक्रमांची छायाचित्र व सहभागी लोकांचा सहभाग नोंदवण्यात आला.

या कार्यक्रमात नाशिक जिल्ह्यात देवळा प्रकल्पाने पहिला क्रमांक पटकावल्याने नासिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लीना बनसोड व जिल्हा कार्यक्रमाधिकारी माननीय दीपक चाटे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन देवळा बालविकास प्रकल्प अधिकारी जयश्री नाईक व प्रकल्पातील सर्व मुख्य सेवकांचा नाशिक येथे नुकताच गौरव करण्यात आला .

या अनुषंगाने यावर्षीही जास्तीत जास्त कार्यक्रम व लोक सहभाग घेऊन राष्ट्रीय पोषण माहअभियान यशस्वी करण्याचे ध्येय ठरविण्यात आले .याप्रसंगी जिल्ह्यातील सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी व तालुका वैद्यकीय अधिकारी ,जिल्हा आरोग्य अधिकारी, शिक्षण अधिकारी, व जिल्हाभरातील सर्व मुख्य सेविका उपस्थित होत्या.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here