Political News | निकालापूर्वी ठाकरेंचा भाजपला दणका!; महत्त्वाच्या नेत्याने हाती घेतली मशाल

0
8
#image_title

Political News | विधानसभा निवडणुकीचा निकाल पूर्वीच शिवसेना उद्धव ठाकरे गटाने भाजपला मोठा धक्का दिला आहे. विधानसभा निवडणुकीत सर्वांचे लक्ष वेधून घेतलेल्या माहीम मतदारसंघांमध्ये ठाकरेंनी भाजपाला हा झटका दिला असून भाजपचे मुंबईचे सचिव व माहीम मधील महत्वाचे नेते सचिन शिंदे यांनी मशाल हाती घेतली आहे.

Political News | ‘आम्हाला दोन्ही बाजूंनी फोन आलेत पण…’; निकालाच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडूंचा मोठा खुलासा

ठाकरेंचा भाजपला झटका

आज सचिन शिंदे व त्यांच्या समर्थकांनी मातोश्री वर शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला असून विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या काही तासांपूर्वी शिंदे यांनी हाती शिवबंधन बांधले आहे. यावेळी माहीमचे उद्धव सेनेचे उमेदवार महेश सावंत, सिनेट सदस्य प्रदीप सावंत उपस्थित होते. शिवसेना भवन, छत्रपती शिवाजी महाराज पार्क याच मतदारसंघात येत असल्यामुळे माहीमची जागा दोन्ही शिवसेनेसाठी महत्त्वाची असून दोघांनीही आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे.

Political News | निकलापूर्वीच दोन्ही गटांचा ‘प्लॅन बी’ रेडी; आमदारांना परराज्यात नेण्यासाठी हॉटेल, विमानं सज्ज

माहीम मध्ये यंदा तिरंगी लढत

दरम्यान, माहीम मध्ये यंदा तिरंगी लढत होत असून विद्यमान आमदार व शिवसेनेचे उमेदवार सदा सर्वणकर, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे महेश सावंत व मनसेचे अमित ठाकरे यांच्यात लढत होत आहे. माहीम मधील राजकारणीतल्या घडामोडी संपूर्ण राज्यभरात चर्चेचा विषय राहिल्या असून शिंदेसेनेकडून सदा सर्वणकर यांना तिकीट देण्यात आले होते. तर लोकसभा निवडणुकीत बिनशर्थ पाठिंबा दिलेल्या राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत स्वभाळावर लढण्याचा निर्णय घेतला. अन माहीममधून पुत्र अमित ठाकरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. परंतु भाजपकडून राज ठाकरेंनी उमेदवारी मागे घ्यावी असा आग्रह धरण्यात आला होता. याकरिता बैठकाही झाल्या. सदा सर्वणकर हे विद्यमान आमदार असल्यामुळे शिंदेंनी त्यांची उमेदवारी मागे घेतली नाही. परीणामी माहीममध्ये यंदा तिरंगी लढत होत आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here