द पॉईंट नाऊ ब्युरो : राज्यात वातावरण खूप तापलेले असल्याने, राज्यातील पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. शिवसैनिक रस्त्यावर उतरण्याची शक्यता असल्याने, पोलीस यंत्रणेस सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि 40 हुन अधिक आमदारांनी बंड केले. यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर झाले आहे. त्यात शिवसेना आणि शिंदे गटात वारंवार एकमेकांवर इशारे-प्रत्युत्तरे सुरू असल्याने, महाराष्ट्रात शिवसैनिकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे.
बहुतांश ठिकाणी शिवसैनिकांनी निदर्शने करत तोडफोड देखील केली. एका बाजूला एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ काही जण उभे असतांना, दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांच्या पोस्टरला काळे फासने, त्यांच्या विरुद्ध निदर्शने झाली आहेत. आता शिवसैनिक रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे. आणि त्यात अजून परिस्थिती बिघडू नये, या कारणाने राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
राज्यात कोणतीही विपरीत बाब घडू नये, परिस्थिती बिघडू नये यासाठी पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शिवसैनिकांमध्ये असलेला असंतोष पाहता, पोलिसांना अलर्ट राहण्यास सांगण्यात आले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम