Police Bharti 2024 | नववर्षांत युवकांना मिळणार पोलीस भरतीचं बंपर गिफ्ट

0
15
Police Bharti 2024
Police Bharti 2024

Police Bharti 2024 | गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील तरूण हे पोलीस भरतीची वाट पाहत होते. आता ही प्रतिक्षा संपली असून पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या उमोदवारांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्र पोलीस दलात 2023 या वर्षात 23 हजार पोलीसांची भरती केल्यानंतर येत्या नववर्षांत पोलीसांची मेगा भरती होणार असून पोलीस भरतीचा नवीन आकृतीबंध हा तयार करण्यात आला आहे. या तयार करण्यात आलेल्या आकृतीबंधानुसार, महाराष्ट्रात पोलिसांच्या अनेक जागा रिक्त असून या जागांवर येत्या नववर्षांत भरती केली जाणार आहे.

Love Marriage | जोडप्याने पळून जाऊन लग्न केलं; घरी परतल्यावर दोघांच्या कुटुंबांनी…

महाराष्ट्रात येत्या २०२४ मध्ये महाराष्ट्र पोलीस दलात 13 हजार पोलिसांची पदं भरण्यात येणार असून नववर्षाच्या सुरूवातीलाच महाराष्ट्र सरकारने राज्यातील युवकांना पोलीस भरतीचे बंपर गिफ्ट दिले आहे. महाराष्ट्रात 70 वर्षांपूर्वीच्या आकृतीबंधानुसारच सध्या महाराष्ट्र पोलीस दलात मनुष्यबळ कार्यरत असून आता नवीन आकृतीबंधामुळे आता राज्यातील हजारो युवकांचे पोलीस दलात काम करण्याचे स्वप्नपूर्ती होणार आहे.

Ajit Pawar | अजित दादांना मोठा धक्का!; ‘हा’ बडा नेता ठाकरेंच्या हाती

Police Bharti 2024 | दरवर्षी जवळपास सहा हजार पोलिसांची पदे रिक्त होत असतात

महाराष्ट्रातील पोलीस दलात सध्या पोलिसांचे मनुष्यबळ अपूर्ण पडत असून याच कारणांमुळे राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यातील आढावा घेण्यात आलेला आहे. प्रत्येक विभागाच्या लोकसंख्येनुसार किती पोलिसांचे मनुष्यबळ महत्वाचे असते त्यानुसार नवीन आकृतीबंध जून महिन्यात तयार करण्यात आली असल्याचे महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तर हा आकृतीबंध तयार करताना प्रत्येक शहर तसेच जिल्ह्याची माहिती मागवण्यात आली यावरून नवीन जागांची भरती केली जाणार आहे.

राज्यातील प्रत्येक शहर, जिल्ह्याकडून वाढीव पोलिस ठाणे आणि मनुष्यबळाच्या मागणीचे प्रस्ताव मागवून घेतले जात असून नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात सतेज पाटील यांनी मांडलेल्या मुद्द्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह विभागाचा १९७६ चा आकृतीबंध नव्याने तयार केल्याचे सांगितले होते. राज्याच्या पोलिस दलात दोन लाख कॉन्स्टेबल आहेत तर त्यात दरवर्षी अडीच ते तीन टक्के पोलिस सेवानिवृत्त होत असतात. एक हजारांपर्यंत पोलिसांची पदोन्नती होते आणि काही जण स्वेच्छानिवृत्ती घेत असतात, तर काहींचा अपघाती किंवा आजारपणामुळे मृत्यू होतो. अशा विविध कारणांमुळे दरवर्षी जवळपास सहा हजार पोलिसांची पदे रिक्त होत असतात, अशी माहिती खास पथके आणि विशेष प्रशिक्षण विभागाकडून सांगण्यात आली आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here