PM Narendra Modi | सध्या देशात सगळीकडे लोकसभा निवडणुकांचा राजकीय वातावरण आहे. सर्वत्र जोरदार प्रचार सुरू असून, सर्वच पक्षांनी यासाठी कंबर कसली आहे. आपापल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी केंद्रीय नेतृत्वही कुठे कमी पडत नसून, या पक्षांचे बडे नेते उमेवारांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. दरम्यान, यातच आता दिल्लीतून एक मोठी बातमी समोर आली असून, ऐन लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरु असताना निवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या विरोधात एक मोठे पाऊल उचलले आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस (congress) नेते राहुल गांधी यांना नोटीस पाठवली आहे. (PM Narendra Modi)
PM Narendra Modi | उद्धव ठाकरे भाजपसोबत येणार?; बड्या नेत्याचा दुजोरा…
PM Narendra Modi | नेमकं प्रकरण काय..?
सध्या देशात सर्वत्र लोकसभा निवडणुकांचा प्रचार सुरू आहे. त्यामुळे आपापल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षाचे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विविध मतदार संघात प्रचारार्थ जाहीर सभा होत आहेत. दरम्यान, निवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्या काही याच सभांमधील काही वक्तव्यांची दखल घेतली असून, यासंबंधी निवडणूक आयोगाने या दोन्ही पक्षांना नोटीस पाठवत याबाबत उत्तर मागवलं आहे.(PM Narendra Modi)
त्यामुळे आता या दोन्ही पक्षांना 29 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत याबाबत उत्तर देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी व राहुल गांधी यांनी आचार संहितेचे उल्लंघन केल्या प्रकरणाची त्यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडून (Election Commission) दखल घेण्यात आली आहे. भाजपा (BJP) व काँग्रेस या दोन्ही पक्षांनी धर्म, जाती, समुदाय, भाषा या आधारे द्वेष व विभाजनाची परिस्थिती निर्माण केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.(PM Narendra Modi)
PM Narendra Modi | मोदींचे नाशकात ‘शक्तिप्रदर्शन’; नेमकं पडद्यामागे चाललंय काय..?
पंतप्रधान मोदींचे वादग्रस्त वक्तव्य काय ?
देशात काँग्रेसचे सरकार सत्तेत आले तर ते, देशाची संपत्ती ही घुसखोर आणि जास्त मुलं असलेल्यांना वाटू शकतील. पंतप्रधान मोदींच्या या वक्तव्यावर काँग्रेस आक्रमक पवित्रा घेतला असून, देशाचे पंतप्रधान हे हिंदू-मुस्लिम भेद करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. यावर कारवाईची मागणीही काँग्रेसने केली होती.
राहुल गांधी यांच्यावरील आरोप काय ?
तर, दुसरीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी हे आपल्या सभेत ज्या प्रकारची भाषा आणि शब्द वापरतात. त्याविरोधात भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असून, राहुल गांधी यांनी तामिळनाडू येथे भाषेच्या आधारावर जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तसेच राहुल गांधी हे आपल्या भाषणात भाषेच्या आधारावर उत्तर व दक्षिण भारतामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचे आरोप भाजपने केले होते.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आणि भाजप अध्यक्ष जे.पी नड्डा यांनी राहुल गांधींविरोधात आचार संहिता उल्लंघनाची तक्रार दाखल केली आहे. यावर आता दोन्ही पक्षांच्या अध्यक्षांना 29 एप्रिल पर्यंत उत्तर देण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम