नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी शिक्षक दिनी ‘पंतप्रधान श्री’ योजना (प्राईम मिनिस्टर – स्कूल फॉर रायिझग इंडिया) आणण्याची घोषणा केली आहे.
काल दिल्लीत पार पडलेल्या शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात ही घोषणा केली आहे. त्यानुसार पंतप्रधान श्री योजनेतंर्गत देशातील तब्बल १४, ५०० शाळा या आदर्श शाळा म्हणून विकसित केल्या जाणार आहेत. या शाळांमध्ये प्रयोगशाळा, स्मार्ट वर्ग, वाचनालये आणि क्रीडा सुविधांसह आधुनिक पायाभूत सुविधा पुरविल्या जाणार आहेत.
यावेळी पंतप्रधान म्हणाले, शिक्षक दिनानिमित्त मला एक नवीन उपक्रम जाहीर करताना आनंद होत आहे. या योजनेच्या माध्यमातून आपण देशातील १४,५०० शाळांचा विकास आणि अद्यावतीकरण करणार आहोत. ज्यामुळे ही मॉडेल स्कूल होतील व राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या संपूर्ण आत्म्याचा समावेश बनतील. या योजनेतील शाळांमध्ये शिक्षणाची नवीन, बदल घडवणारी आणि सर्वांगीण विकास करणारी पद्धत असेल. याचा मोठा फायदा हा विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम