Uddhav Thackeray | ‘मेरिही दाढी सफेद’ असे बदमाश नाशिकमध्ये; सुषमा अंधारेंचा भूसेंवर वार

0
19
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray

Uddhav Thackeray |  काल अयोध्या येथे राम मंदिराचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. मात्र, काल शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे अयोध्येला न जाता नाशिकमध्ये दाखल झाले. काल त्यांनी भगुर येथे स्वतंत्र्य वीर सावरकरांच्या स्मृति स्थळाला भेट देत अभिवादन केले. त्यानंतर संध्याकाळी त्यांनी सहकुटुंब पंचवटी येथे काळाराम मंदिरात दर्शन घेतले आणि गोदा आरतीही केली. आज हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती असून, त्यांना अभिवादन करून नाशिकमध्ये ठाकरे गटाचे राज्यव्यापी अधिवेशन हे डेमोक्रसी हॉटेलमध्ये पार पडत आहे.(Uddhav Thackeray)

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज उद्धव ठाकरे हे नाशिमध्ये प्रचाराचा नारळ फोडणार आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाच्या आमदारांवर लगातार ईडीच्या धाड पडत आहेत. त्या पार्श्वभूमीवरही उद्धव ठाकरे काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या तीन दिवसीय अधिवेशनासाठी तब्बल २००० पदाधिकारी हे राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक याठिकाणी दाखल झालेले आहेत. या अधिवेशनात ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिवसैनिकांना संबोधित केले. यावेळी त्या म्हणाल्या की,”

Uddhav Thackeray | उद्धव साहेब ‘वेट अँड वॉच’ आपलीही वेळ येईल – संजय राऊत

“आज अधिवेशन नाशिकमध्ये होत आहे. ‘मेरिही दाढी सफेद’ असे म्हणणारे काही बदमाश नाशिकमध्ये आहेत. असा खोचक टोला यावेळी सुषमा अंधारे याआणि पालकमंत्री दादा भुसे यांना लगावला. पुढे त्या म्हणाल्या “उगीच उडते तीर आपल्यावर ओढणारे काही लोक नाशिकमध्ये आहे. नाशिकमध्ये ललित पाटीलसारखे गुन्हेगार आहेत. गेल्या वेळी नाशिकमध्ये अधिवेशन झाले तर, शिवसेनेची सत्ता आली. आता पुन्हा नाशिकमध्ये अधिवेशन होत आहे. ही पुन्हा शिवसेनेची सत्ता येण्याची चिन्हे आहेत.” असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यकात केला. (Uddhav Thackeray)

Uddhav Thackeray | तुम्ही आमच्या महिला वर्गासाठी आदर्श

“आपण आमच्यासाठी आदर्श आहत. कारण जसे, प्रभू श्रीराम हे एकवचनी आणि एकपत्नी आहेत. त्याची प्रचिती आम्हाला तुमच्यातही काल आली. तुम्ही कुठेही आमच्या वाहिणींचे अधिकार हिसकावले नाही. तिकडे काही लोक स्वतःला राम म्हणतात आणि सीता वनवासातच. त्यामुळे तुम्ही आमच्या महिला वर्गासाठी आदर्श आहात.”

मोदींच्या राज्यात महिला सुरक्षित नाही 

मोदींच्या राज्यात महिला रात्री बारा तर, सोडा दिवसा बारा वाजताही सुरक्षितरीत्या फिरू शकत नाही. कालच्या कार्यक्रमात राष्ट्रपतींना न बोलावून त्यांनी महिला शक्ती पायदळी तुडवली. यांनी फक्त घोषणा केल्या की, महिलांना इकडे आरक्षण तिकडे आरक्षण. मात्र, जो पर्यंत राज्यात जातनिहाय जनगणना होत नाही तोपर्यंत महिलांना आरक्षण मिळणार नाही. काल त्यांनी फक्त रामाचा प्राचाराचा ‘टूल कीट’ म्हणून वापर केला. महाभारत बघता, शकुणीच्या सहाय्याने आधी कौरव जिंकले मात्र, प्रत्यक्ष महाभारतात जेव्हा युद्ध झाले. तेव्हा संख्येने कमी असलेल्या पांडवांनीच विजय मिळवला. तसंच राहुल नार्वेकर यांच्यामुळे आज तुम्ही जिंकला असलात तरी, प्रत्यक्ष युद्ध होईल तेव्हा आम्हीच जिंकु. हे ४०ही गडदार आम्ही पाडू.” असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. (Uddhav Thackeray)

Uddhav Thackeray | ठाकरे गटाचं आज नाशिकमध्ये शक्तीप्रदर्शन

रोज कोणीतरी टिल्ले पिल्ले उठतात… 

आम्हाला अभिमान आहे की आमच्याकडे राजन साळवी यांच्यासारखे शिवसैनिक आमच्याकडे आहे. आमच्याकडे सूरज चव्हाण सारखे शिवसैनिक आहेत जे म्हणतात की, “आदित्य दादा चिंता करू नाक वेळ आलीच तर जेलमध्ये जाऊ पण तुमची साथ सोडणार नाही” असे प्रामाणिक शिवसैनिक आमच्यासोबत आहेत.

रोज कोणीतरी दीड दोन फुटांचे ‘टिल्ले पिल्ले’ उठतात आणि आमच्या बायकांवर बोलतात. हे शेंबडे पोरं आहेत, ज्यांना राजकारणातला ‘र’ पण काळत नाही आणि ते येऊन बोलतात. मी आधीही सांगितलं होतं आणि आताही सांगते, “वारूळ मुंग्या तयार करतात आणि त्याच्यात नंतर विषारी नाग राहतात. ‘आरएसएस’ ने सत्तेचे वारूळ तयार केले आणि त्यात भाजपचे विषारी नाग राहतात. सुषमा अंधारेचा हाच प्रॉब्लेम आहे की, माझं ईडी बिडी काही सापडत नाही. त्यामुळे काहीतरी जून रेकॉर्ड काढतात. जा, मी भीक घालत नाही. घाबरत नाही मी तुम्हाला. नाशिकचे पण काही २-४ आमदार खासदार आहेत. त्यांना पण मला हेच सांगायचेय की जा आणि जे करायचे ते करा. आत गेलो तरी आत बसून लढु. या शब्दांत सुषमा अंधारे यांनी भाजप नेते नितेश राणे यांच्यावर अंधारे यांनी टीका केली आहे. (Uddhav Thackeray)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here