मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. यावेळी ते 38000 कोटींहून अधिक किमतीच्या विकासकामांशी संबंधित प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील. यामध्ये मुंबई मेट्रो 2 अ आणि 7 चे उद्घाटन, 1 हजार 750 कोटींचा मुंबई सुशोभीकरण आराखडा, 1 लाखांहून अधिक फेरीवाल्यांसाठी 10 हजारांची कर्ज योजना, मुंबईतील 400 किलोमीटर रस्त्यांचे काँक्रिटीकरण, बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर असलेला 20 ‘आपका दावाखाना’ यांचा समावेश आहे. पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यामुळे मुंबईतील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.
घाटकोपर मेट्रो सेवा संध्याकाळी 5.45 ते 7.30 पर्यंत बंद राहणार आहे. म्हणूनच पीक आवरमध्ये ऑफिस ते घर मेट्रोने जाणाऱ्यांनी त्यांचा दुसरा प्लॅन तयार ठेवावा. घराबाहेर पडण्यापूर्वी वाहतुकीचे बदललेले नियम जाणून घेणे गरजेचे आहे.
या मार्गावरील रस्ते बंद राहणार आहेत
फॅमिली कोर्ट जंक्शनपासून कुर्ल्याकडे जाणारा रस्ता.
संत ज्ञानेश्वर मार्गावरून कुर्ला रस्त्याकडे जाणाऱ्या सर्व वाहनांसाठी आयकर जंक्शनच्या पुढे बीकेसी क्षेत्र कुर्ल्याकडे जाणाऱ्या.
खेरवाडी शासकीय वसाहत कनकिया पॅलेस, बीकेसी परिसर, वाल्मिकी नगरच्या पलीकडे, चुना भाटी आणि कुर्ल्याकडे जाणारा रस्ता.
सुर्वे जंक्शन आणि रज्जाक जंक्शन येथून बीकेसी परिसर, धारावी, वरळी सी लिंककडे जाणाऱ्या सर्व वाहनांचा प्रवेश बंद.
सुर्वे जंक्शन आणि रज्जाक जंक्शन येथून बीकेसी परिसर, धारावी, वरळी सी लिंककडे जाणाऱ्या सर्व गाड्यांसाठी एमटीएनएल जंक्शनकडून प्रवेश बंद असेल.
संपूर्ण बीकेसी परिसरात कोणालाही त्यांचे वाहन कुठेही पार्क करता येणार नाही.
हे पर्यायी मार्ग वापरा
पश्चिम द्रुतगती मार्ग, धारावी, वरळी सीलिंकवरून बीकेसी-कुर्ल्याकडे जाणाऱ्या गाड्या ईस्टर्न एक्स्प्रेस वेवरून कुर्ल्याकडे एमएमआरडीए जंक्शन मार्गे धारावी टी जंक्शन मार्गे वळवण्यात येतील.
प्राप्तिकर जंक्शन मार्गे संत ज्ञानेश्वर मार्गे बीकेसी-कुर्ल्याकडे जाणाऱ्या गाड्या कलानगर रोडने गुरुनानक हॉस्पिटलजवळील जगत विद्यामंदिर जंक्शन मार्गे कुर्ल्याकडे जातील आणि पुढे धारावी टी जंक्शन मार्गे कुर्ल्याच्या दिशेने जातील.
खेरवाडी शासकीय वसाहत कनकिया पॅलेस, वाल्मिकी नगर येथून बीकेसी, चुना भट्टी आणि कुर्ल्याकडे जाणाऱ्या गाड्या वाल्मिकी नगर येथून शासकीय वसाहत मार्गे यू टर्न घेतील आणि कलानगर जंक्शनवरून थेट टी जंक्शन मार्गे कुर्ल्याकडे जातील.
सुर्वे जंक्शन आणि रज्जाक जंक्शन येथून पश्चिम द्रुतगती मार्ग, धारावी, वरळी सीलिंककडे जाणाऱ्या गाड्या सुर्वे जंक्शन, रज्जाक जंक्शन, एमटीएनएल जंक्शन मार्गे सीएसटी रोडमार्गे मुंबई विद्यापीठ मेनगेट, आंबेडकर जंक्शन, हंसभुगरा जंक्शन मार्गे पुढे जातील.
ईस्टर्न एक्स्प्रेस वे, चुनाभट्टी ते कनेक्टर रोडवरून येणाऱ्या गाड्या NSE जंक्शन, इन्कम टॅक्स जंक्शन, फॅमिली कोर्ट, MMRDA या दिशेने जातील.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम