पिंपळगाव (वा.) विकास संस्थेच्या चेअरमनपदी समाधान सोनजे बिनविरोध

0
36
पिंपळगाव (वा.) विकास संस्थेच्या चेअरमनपदी समाधान सोनजे यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर सत्कार करतांना सुनील पाटील, नदिश थोरात, दिलीप पाटील व उपस्थित संचालक मंडळ (छाया - सोमनाथ जगताप)

देवळा : पिंपळगाव ( वा.) विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या चेअरमनपदी समाधान सोनजे यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहायक निबंधक सुजय पोटे यांनी केली.

पिंपळगाव (वा.) विकास संस्थेच्या चेअरमनपदी समाधान सोनजे यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर सत्कार करतांना सुनील पाटील, नदिश थोरात, दिलीप पाटील व उपस्थित संचालक मंडळ (छाया – सोमनाथ जगताप)

पिंपळगाव विकास संस्थेचे चेअरमन नामदेव थोरात यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त जागेवर मंगळवार ( दि. २९ ) रोजी सहायक निबंधक कार्यालयात निवडणूक घेण्यात आली. निर्धारित वेळेत समाधान सोनजे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी ज्येष्ठ नेते दिलीप पाटील, उपसरपंच नदिश थोरात, दिनेश वनसे, शरद थोरात, संचालक सुनील पाटील, एकनाथ खैरणार, जितेंद्र थोरात, नामदेव थोरात, नितीन थोरात, संदीप थोरात, साहेबराव बागुल, नर्मदाबाई खैरणार, हिरुबाई वाघ, हनुमंत जाधव, नंदू वाघ आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here