चित्रा वाघ शिवाजीनगर पोलिस स्टेशनात दाखल

0
28

शिवसेना नेते रघुनाथ कुचिकप्रकरणी भाजपा नेत्या चित्रा वाघ पुण्याच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले आहेत . रघुनाथ कुचिकप्रकरणी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये जबाब नोंदवण्या करता उपस्थित झाला आहे.

लैंगिक शोषणप्रकरणी एका तरुणीने रघुनाथ कुचिक यांची तक्रार केली होती, त्यानुसार गुन्हा दाखल झाला होता. तर सध्या कुचिक जामिनावर आहेत. मात्र त्यांचा जामीन रद्द करण्याची मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे. . यावरच शिवसेना नेते रघुनाथ कुचिकप्रकरणी भाजपा नेत्या चित्रा वाघ शिवाजीनगर पोलीस स्टेशनला जबाब नोंदवण्या करता पोहोचले असून त्यांच्याबरोबर काही एडवोकेट सुद्धा आहेत.

ट्विटमध्ये त्यांनी रघुनाथ कुचिक यांचा बलात्कारी तसेच एकेरी उल्लेख केला आहे. ‘रघुनाथ कुचिक जामिनावर बाहेर असून जामिनाच्या अटीशर्तींचा त्याने भंग केल्याने चौकशी होत आहे. रघुनाथ कुचिकचा जामीन रद्द व्हावा, ही मागणी’. चित्रा वाघ यांनी केली आहे. रघुनाथ कुचिक यांचा जामीन रद्द करण्याची मागणी वाघ यांनी केली होती.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here