पेट्रोल डिझेल मागोमाग; सीएनजी गॅस दरात मोठी वाढ

0
15

पुणेकरांना झटका देणारी बातमी पेट्रोल-डिझेल दरवाढी बरोबरच आता सीएनजी दरात देखील मोठी वाढ करण्यात आली आहे.सीएनजीच्या दरातही प्रति किलोमागे दोन रूपये 20 पैशांची वाढ करण्यात आली आहे. इंधनाच्या दरात सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.

सीएनजी गॅस प्रति किलो दोन रूपयांनी महाग झाल्याने याचा मोठा फटका हा ग्राहकांना बसणार आहे, आधीच महागाई वाढत आहे. पेट्रोल डिझेल आणि सीएनजी देखील सातत्याने वाढ होऊ लागल्यामुळे वाहन चालक त्रस्त झाले आहेत. पुण्यातील सामान्य नागरिकांना चांगलाच फटका बसत आहे. गेल्या दोन महिन्यांत सीएनजीच्या दरात ही तिसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी सीएनजीचा दर 68 रुपये इतका होता मात्र, पाच रुपयांनी वाढ झाल्याने हा दर 73 रुपयांवर पोहोचला. त्यानंतर पुन्हा एकदा दोन रुपयांची वाढ होऊन हा दर 75 रुपयांवर पोहोचला.

मुंबई देखील सीएनजी गॅसच्या दरात वाढ करण्यात आली आहे. तब्बल सीएनजी गॅसमध्ये पुन्हा एकदा 2 रुपये 20 पैशांनी वाढ झाल्याने सीएनजीचा दर 77 रुपये 20 पैसे प्रति किलो इतका झाला आहे. एकीकडे सीएनजीच्या दरात आज किलोमागे दोन रुपयांची वाढ झाली आहे, मात्र दुसरीकडे दिलासादायक बातमी म्हणेज आज पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.गेल्या 22 मार्चपासून पेट्रोल, डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होती. मागील काही दिवसांपासून इंधन दरवाढीला ब्रेक लागल्याने सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here