Dhule : प्रार्थनास्थळाची विटंबना करणारे धुळे पोलिसांच्या ताब्यात.

0
12

धुळे तालुक्यातील नेर येथे काही समाजकंटकांनी प्रार्थनास्थळाची विटंबना केल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील अल्पवयीन मुलासह पाच जणांना धुळे तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच जुन्या वादातून त्यांनी हा प्रकार केल्याची कबुली आरोपींनी दिली असल्याची माहिती पत्रकार परिषदेत तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी माहिती दिली

एकीकडे राज्यांमध्ये धार्मिक वातावरण तापलेल असतानाच दुसरीकडे काही समाजकंटकांकडून दोन ते तीन जून या दरम्यान पहाटे नेर येथे प्रार्थना स्थळाची विटंबना करण्याचा प्रकार घडला होता.  या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर एक संशयित पुणे येथील एमआयडीसीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सहायक निरीक्षक विलास ताटीकोंडलवार, उपनिरीक्षक अनिल महाजन, हवालदार प्रवीण पाटील, मुकेश पवार, रवींद्र माळी, प्रमोद ईशी यांच्या पथकाने पुणे येथून गणेश शिरसाठ (२२) याला ताब्यात घेतले. त्याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने हे कृत्य केल्याची कबुली दिली. तसेच त्याने त्याच्या साथीदारांची नावे पोलिसांना सांगितली.

दरम्यान गणेश शिरसाठ याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी भीमराव कुंवर (३६), विक्की कोळी (२१), रोहित जगदाळे (२१) आणि एक अल्पवयीन मुलगा, अशा चौघानाही ताब्यात घेतले.

प्रार्थना स्थळाची विटंबना केल्यानंतर धुळे शहरात मोठ्या प्रमाणावर तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. अनेक संघटनांकडून मोर्चे काढून या प्रकरणातील आरोपींना शिक्षा देण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात आली होती. या जन आक्रोश मोर्चामध्ये हजारो धुळेकरांनी सहभाग घेतल्यामुळे धुळे शहरांमध्ये बंद सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यातच गेल्या काही दिवसांपासून धुळे शहरातील वातावरण चिघळत असल्याचं बघायला मिळत होतं. दरम्यान पोलिसांनी आपली तपास सूत्र फिरवत या प्रकरणाचा छडा लावला आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाई च सर्व स्तरातून कौतुक केलं जातं आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here