देवळा : सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या येथील श्री रामराव आहेर नागरी सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी एकूण १६३८ मतदारांपैकी ११४२ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
एकूण ७० टक्के मतदान झाले. सकाळपासून मतदानासाठी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला . मतदान शांततेत पार पडले . कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता . मतमोजणी लागलीच म्हणजे साडे चार वाजता सुरू होईल . यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे . अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पाटील यांनी दिली . दरम्यान ,मतदान प्रक्रिया कामी सहायक निबंधक सुजय पोटे मतदान केंद्रावर लक्ष ठेऊन होते .
सर्वच उमेदवारांनी विजयाचा दावा केला आहे. यामुळे कुणाला गुलाल कुणाला नारळ याकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम