Shah Rukh Khan Pathaan Box office Collection: हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज शाहरुख खानचा बहुप्रतिक्षित ‘पठाण’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर सातत्याने धुमाकूळ घालत आहे.
रिलीज होऊन ४ दिवस उलटले तरी ‘पठाण’ची क्रेझ कमी होण्याचे नाव घेत नाहीये, त्यामुळे ‘पठाण’चे बॉक्स ऑफिस कलेक्शनही झपाट्याने वाढत आहे. दरम्यान, शाहरुख खानच्या ‘पठाण’च्या चौथ्या दिवसाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे समोर आले असून, त्यात ‘पठाण’ने २०० कोटींच्या भरघोस नफा कमावल्याचे स्पष्ट झाले आहे.
रिलीजच्या पहिल्याच दिवशी 55 कोटींची नेत्रदीपक ओपनिंग मिळवलेल्या ‘पठाण’मुळे, शाहरुख खानचा चित्रपट पहिल्या वीकेंडपर्यंत 200 कोटींचा जादुई आकडा पार करेल अशी अपेक्षा होती. असेच काहीसे घडले असून वीकेंडच्या एक दिवस आधी ‘पठाण’ने बॉक्स ऑफिसवर द्विशतक ठोकले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम