देवळा ; राष्ट्रीय जिल्हा पंचायत असोसिएशनच्या वतीने नामपूर येथील रवींद्र भाऊसाहेब अहिरे यांना समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या असोसिएशनच्या वतीने नाशिक येथे नूतन पदाधिकाऱ्यांचा पद्ग्रहण समारंभ रविवारी दि १० रोजी पार पडला . यावेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंकज जी रहांगडे यांची तर राष्ट्रीय नगरसेवक असोसिएशनच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी दिनकर पाटील यांची निवड करण्यात आली.
या राष्ट्रीय परिषदेच्या पद्ग्रहण समारंभात नामपूर येथील रवींद्र भाऊसाहेब अहिरे यांना समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी संस्थापक अध्यक्ष कैलास पाटील ,राज्य महिला उपाध्यक्ष सारिता गाखरे बळीराजा संघटनेचे अध्यक्ष व बाजार समितीचे माजी सभापती भाऊसाहेब अहिरे ,देवळा बाजार समितीचे संचालक भाऊसाहेब पगार,उद्योजक बाळासाहेब गुंजाळ आदी मान्यवर उपस्थित होते .नूतन पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम