Sima haidar inquiry : पबजी गेम खेळत असताना झालेल्या प्रेमातून पाकिस्तानची असलेली सीमा हैदर ही भारतात दाखल झाली आणि यामुळे उलट सुलट चर्चांना उधाण आले. दोन दिवसांपूर्वी तिला एटीएसने ताब्यात घेतला आणि तिची कसून चौकशी करण्यात येत आहे या दरम्यान तिने मोठा खुलासा केला असल्याची माहिती समोर येत आहे.
उत्तर प्रदेश एटीएसने सीमा हैदरच्या चौकशीबाबत मोठा खुलासा केला असल्याचं समजत आहे. या चौकशी दरम्यान सीमा हैदर हिने सांगितले की,
तिचा प्रियकर सचिनच्या आधी देखील तिने भारतातील अनेक लोकांशी संपर्क साधला होता. सीमा हैदर हिने ज्या लोकांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला त्यापैकी बहुतेक लोक हे दिल्ली एनसीआर मधील होते. दरम्यान एटीएसच्या चौकशीमध्ये सीमा हैदरने प्रत्येक प्रश्नाचं शातिरपणे उत्तर दिलं आहे. चौकशीत तिच्या चेहऱ्यावर ना कसली भीती होती ना कुठलं टेन्शन असं देखील सांगण्यात येत आहे
सीमा हैदर हिची मंगळवारी तब्बल दहा तास करण्यात आली कसून चौकशी
पाकिस्तान मधून भारतात आलेल्या सीमा हैदर ही अतिशय तीक्ष्ण मनाची आहे. कालच्या चौकशीनंतर सीमा हैदर कडून कोणतीही माहिती काढणं सोपं नाही असं मत एटीएस कडून नोंदवण्यात आले आहे. चौकशी दरम्यान सीमा हैदरला इंग्रजीच्या काही ओळी वाचायला लावण्यात आल्या होत्या ज्या सीमा हैदरने अगदी चांगल्या प्रकारे वाचल्या आणि इंग्रजी उच्चारही बरोबर होते असे देखील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आल आहे. सीमा हैदर ची एटीएसने स्वतंत्रपणे चौकशी केली असून तिने प्रत्येक प्रश्नाला अत्यंत चालाखीने उत्तर दिल आहे. सीमा इदरची सोमवारी युपीएटीएस ने नोएडाच्या सेक्टर 94 कार्यालयात तब्बल दहा तास चौकशी केली आहे.
पबजी खेळून अनेक भारतीयांसोबत केला संपर्क
उत्तर प्रदेश एटीएस च्या चौकशीमध्ये सीमा हैदर हिने सचिन मीना याच्यासोबत ओळख होण्याआधी अनेक भारतीयांशी जवळीक वाढवली होती. तेव्हाच पब्जी गेम खेळताना तिचा सचिन सोबत संपर्क झाला. दरम्यान तिने जवळीक वाढवलेले लोक नेमके कोण? आहेत याची माहिती एटीएसने घेतली असून या लोकांचा देखील शोध घेऊन त्यांची देखील चौकशी करण्यात येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. तर आज देखील सीमा ची चौकशी केली जाणार आहे. मात्र तिची चौकशी कुठे केली जाईल याबाबत कोणतीही माहिती नसल्याने आजच्या चौकशीत नेमकं काय समोर येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
पबजी गेम खेळत असताना झालेल्या प्रेमातून पाकिस्तानची असलेली सीमा हैदर ही भारतात दाखल झाली आणि यामुळे उलट सुलट चर्चांना उधाण आले. दोन दिवसांपूर्वी तिला एटीएसने ताब्यात घेतला आणि तिची कसून चौकशी करण्यात येत आहे या दरम्यान तिने मोठा खुलासा केला असल्याची माहिती समोर येत आहे.
उत्तर प्रदेश एटीएसने सीमा हैदरच्या चौकशीबाबत मोठा खुलासा केला असल्याचं समजत आहे. या चौकशी दरम्यान सीमा हैदर हिने सांगितले की,
तिचा प्रियकर सचिनच्या आधी देखील तिने भारतातील अनेक लोकांशी संपर्क साधला होता. सीमा हैदर हिने ज्या लोकांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला त्यापैकी बहुतेक लोक हे दिल्ली एनसीआर मधील होते. दरम्यान एटीएसच्या चौकशीमध्ये सीमा हैदरने प्रत्येक प्रश्नाचं शातिरपणे उत्तर दिलं आहे. चौकशीत तिच्या चेहऱ्यावर ना कसली भीती होती ना कुठलं टेन्शन असं देखील सांगण्यात येत आहे
सीमा हैदर हिची मंगळवारी तब्बल दहा तास करण्यात आली कसून चौकशी
पाकिस्तान मधून भारतात आलेल्या सीमा हैदर ही अतिशय तीक्ष्ण मनाची आहे. कालच्या चौकशीनंतर सीमा हैदर कडून कोणतीही माहिती काढणं सोपं नाही असं मत एटीएस कडून नोंदवण्यात आले आहे. चौकशी दरम्यान सीमा हैदरला इंग्रजीच्या काही ओळी वाचायला लावण्यात आल्या होत्या ज्या सीमा हैदरने अगदी चांगल्या प्रकारे वाचल्या आणि इंग्रजी उच्चारही बरोबर होते असे देखील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आल आहे. सीमा हैदर ची एटीएसने स्वतंत्रपणे चौकशी केली असून तिने प्रत्येक प्रश्नाला अत्यंत चालाखीने उत्तर दिल आहे. सीमा इदरची सोमवारी युपीएटीएस ने नोएडाच्या सेक्टर 94 कार्यालयात तब्बल दहा तास चौकशी केली आहे.
पबजी खेळून अनेक भारतीयांसोबत केला संपर्क
उत्तर प्रदेश एटीएस च्या चौकशीमध्ये सीमा हैदर हिने सचिन मीना याच्यासोबत ओळख होण्याआधी अनेक भारतीयांशी जवळीक वाढवली होती. तेव्हाच पब्जी गेम खेळताना तिचा सचिन सोबत संपर्क झाला. दरम्यान तिने जवळीक वाढवलेले लोक नेमके कोण? आहेत याची माहिती एटीएसने घेतली असून या लोकांचा देखील शोध घेऊन त्यांची देखील चौकशी करण्यात येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. तर आज देखील सीमा ची चौकशी केली जाणार आहे. मात्र तिची चौकशी कुठे केली जाईल याबाबत कोणतीही माहिती नसल्याने आजच्या चौकशीत नेमकं काय समोर येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम