दिल्ली – दोन आठवड्यांपूर्वी भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करताना अटक केलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्याचा शनिवारी मृत्यू झाला. विशेष म्हणजे, उपचारादरम्यान भारतीय जवानांनी त्याला रक्तदान केले होते.
तबारक हुसैन असे या दहशतवाद्याचे नाव असून त्याच्यावर जम्मू काश्मीरच्या राजौरी येथील लष्कर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्याला उपचारावेळी ह्रदयविकाराचा झटका आल्याने निधन झाले आहे. विशेष म्हणजे, भारतीय जवानांनी उपचारादरम्यान त्याला रक्त दिले होते.
तबारक हा पाकव्याप्त काश्मीरचा निवासी होता. भारतावर हल्ला करण्याच्या हेतूने पाकिस्तान लष्कराने त्याला पाठवले होते. त्यासाठी पाकिस्तान गुप्तचर विभागातील कर्नल युनूस चौधरीने ३० हजार पाकिस्तानी रुपये तबारकला दिले होते. गेल्या महिन्यात राजौरी जिल्ह्यात नौशेरा सेक्टर येथे त्याने अन्य तिघांसोबत भारतीय नियंत्रण रेषा ओलांडत देशात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी लष्कराने केलेल्या गोळीबारात तो जखमी झाला होता, तर दोघे तिथून पळून गेले होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम