बाहेरचे केमिकल प्रॉडक्ट्स न वापरता पाण्यात मिसळा या गोष्टी होतील चमकदार केस घरच्या घरी!

0
14

The point now – Swati kadam

रेशमी आणि चमकदार केस मिळवणे फार कठीण नाही. काही गोष्टी पाण्यात मिसळून केसांची निगा सहज करता येते. आणि ते पण केमिकल फ्री केस धुतल्यानंतर अनेकदा कोरडे आणि निर्जीव दिसतात. अशा परिस्थितीत केस सुंदर दिसण्यासाठी काय करावे जेणेकरून ते नैसर्गिकरित्या चमकदार दिसावेत आणि कोणतेही महागडे उत्पादन घ्यावे लागणार नाही हे समजत नाही. खरं तर तुम्हाला फार काही करण्याची गरज नाही केस धुण्याच्या पाण्यात काही गोष्टी मिसळा. या पाण्याने केस धुतल्याने तुमचे केस रेशमी आणि चमकदार होतील.

• घरच्या घरी रेशमी चमकदार केस कसे मिळवायचे?

केसांना मॉइश्चरायझ करण्यात कॉफी चांगला प्रभाव दाखवते. हे वापरण्यासाठी एक कप पाण्यात कॉफी घाला. बारीक ग्राइंड कॉफी वापरा जेणेकरून त्याचे कण केसांमध्ये अडकणार नाहीत. या पाण्याने केस धुवा आणि १५ मिनिटे तसेच राहू द्या. 15 मिनिटांनी केस स्वच्छ पाण्याने धुवा. जेणेकरून तुमचे केस चमकदार आणि मऊ होते आणि त्यांना पुरेसा मॉइश्चर मिळेल.

टाळूवर साचलेल्या घाणीमुळे केसही निर्जीव दिसू लागतात. केसांची ही समस्या दूर करण्यासाठी एप्पल सायडर व्हिनेगर फायदेशीर ठरेल. एक कप पाण्यात सफरचंद सायडर व्हिनेगरच्या 2 थेंब मिसळा. शॅम्पू केल्यानंतर या पाण्याने केस धुवा. आठवड्यातून एकदा ही पद्धत अवलंबता येते.

• कडुलिंब

डोक्याची खाज दूर करण्यासाठी ही कृती विशेषत फायदेशीर आहे. कडुलिंब केसांची निगा राखण्यात खूप चांगला आहे. हे पाणी बनवण्यासाठी कडुलिंबाची पाने गरम पाण्यात काही वेळ उकळवून थंड करा. या पाण्याने आपले डोके धुतल्यानंतर काही वेळ आपले डोके स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे तुमचं डोक्याची खाज जायलाच आणि पूर्णपणे केस स्वच्छ होतील.

• मध

केसांची चमक आणण्यासाठी आणि त्यांना नरम बनवण्यासाठी पाण्यात मध मिसळले जाऊ शकते. या पाण्याने आपले डोके धुवा आणि 5 ते 10 मिनिटे ठेवा. पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने केस चांगले धुवा. केस मऊ करण्यासाठी दुधात मध मिसळूनही हेअर वॉश सुद्धा करू शकता.

• दही

केसांना मॉइश्चरायझ करण्यासोबतच दही टाळूची स्वच्छताही करते. घाण काढून टाकण्यासाठी आणि केसांना नैसर्गिक चमक आणण्यासाठी तुम्ही दही वापरू शकता. एका मगमध्ये पाणी घेऊन त्यात २ ते ३ चमचे दही घाला. पाण्याने डोके धुतल्यानंतर पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने केस धुवून घ्या यामुळे तुमचे केस अधिक नरम होतात आणि केसांमधील कोंडा ही दूर होतो.

• दही आणि लिंबू

हिवाळ्यामध्ये कोंड्याची समस्या वाढते जर तुमचा डोक्यामध्ये खूप कोंडा झाला असेल तर बाहेरचे केमिकल प्रॉडक्ट्स युज न करता तुम्ही घरी एका वाटीत दोन ते तीन चमचे दही आणि लिंबाचे दोन ते तीन थेंब टाकून याचे मिश्रण तयार करू शकता . त्यानंतर हे केसांना लावून 15 ते 20 मिनिटं ठेवल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुऊ शकता यामुळे तुमच्या डोक्यातील कोंड्याची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here